सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लोक छंद म्हणून मुलांची छायाचित्रे आणि चित्रफिती शेअर करत असतात. पण काही लोक हे काम ‘व्यावसायिक’ स्वरुपात करतात. असेच जग आहे इन्स्टाग्रामचे. जेथे छोटय़ा इन्फ्लुएंसर मुलांची कामगिरी पाहून मोठी लोकं दंग होत आहेत.
जन्मापासूनच प्रसिद्धीच्या झोतात
नूह तवरेस नावाचा मुलगा जन्मापासूनच सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला आहे. 10 लाख फॉलोअर्ससह तवरेस लोकप्रिय इन्स्टाग्राम बेबीजच्या यादीत अग्रस्थानी आहे. तवरेसच्या प्रत्येक पोस्टला सरासरी 44 हजारांहून अधिक लाइक्स प्राप्त होतात. एका अनुमानानुसार प्रत्येक पोस्टसाठी त्याची कमाई सुमारे 3.5 लाख रुपये इतकी आहे.
बेबी मार्ले ग्रांट
इन्स्टाग्रामवर हिट बेबीजच्या यादीत मार्ले ग्रांटचे नाव देखील सामील आहे. ग्रांटच्या स्वतःच्या काकांसोबतच्या एका चित्रफितीने मोठा धुमाकूळ घातला आहे. मार्ले ग्रांटला प्रत्येक पोस्टसाठी सरासरी दीड लाख लाइक्स मिळतात. 10 लाखांच्या आसपास फॉर्लोअर्स असलेल्या प्रत्येक पोस्टपासून सुमारे 3 लाख रुपयांची कमाई होते.
हॅल्स्टन ब्लेक फिशर
दोन वर्षीय हॅल्स्टन ब्लेक फिशरचे इन्स्टाग्रामवर 6 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिच्या प्रत्येक पोस्टला सरासरी 50 हजार लाइक्स प्राप्त होतात. म्हणजेच ती प्रत्येक पोस्टद्वारे 2 लाख रुपये कमावत असावी.
ड्रू हेजेल अन् फ्लाविया लुईस
इन्स्टाग्रामवर ड्रू हेजल स्वतःच्या प्रेमळ हास्यासाठी प्रसिद्ध आहे. ती प्रत्येक पोस्टला हजारो लाइक्स मिळविते. हेजेलचे सुमारे 5 लाख फॉलोअर्स आहेत. म्हणजेच प्रत्येक पोस्टसाठी ती 1 लाख 85 हजारांहून अधिक रुपयांची कमाई करते. तर फ्लाविया लुइसचे 2,57,413 फॉलोअर्स असून तिला प्रत्येक पोस्टपासून 86 हजार रुपयांची कमाई होते. या सर्व मुलामुलीचे वय 4-5 वर्षांदरम्यान आहे.