इन्स्टाग्राम या फोटो शेअरिंग ऍपने अक्षरशः तरुणाईला वेड लावले आहे. या ऍपवर सर्वाधिक फॉलोअर्स मिळवण्यासाठी सेलिब्रिटींमध्ये स्पर्धा वाढत असल्याचे चित्र आहे. बॉलिवूड अभिनेत्रींपैकी ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राने ही स्पर्धा जिंकली आहे.
प्रियांकाच्या फॉलोअर्सचा आकडा 7 कोटी 25 लाख इतका झाला आहे. अभिनेत्री श्रद्धा कपूर या यादीत दुसऱया क्रमांकावर आहे. तिचे फॉलोअर्स
6 कोटी 86 लाख इतके आहेत. दीपिका पदुकोण तिसऱया स्थानी असून
6 कोटी 35 लाख तिचे फॉलोअर्स आहेत. नुकतीच विवाहबद्ध झालेली टायगर फेम अभिनेत्री कतरिना कैफ चौथ्या क्रमांकावर आहे. तिचे 6 कोटी 4 लाख फॉलोअर्स दिसत आहेत.
बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अर्थात अभिनेता अक्षयकुमार पाचव्या स्थानी असून त्याचे 5 कोटी 84 लाख फॉलोअर्स आहेत. मोठी डिमांड असणारी ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा तिच्या एका प्रमोशनल पोस्टसाठी तब्बल तीन कोटी रुपये मानधन घेत असल्याचे सांगितले जात आहे.