वृत्तसंस्था/ रोम
एसी मिलान संघाचा हुकमी स्ट्रायकर इब्राहिमोव्हिक आणि इंटर मिलान फुटबॉल संघातील रोमेलो लुकाकु यांच्यात कोपा इटालिया फुटबॉल स्पर्धेतील गेल्या जानेवारीत झालेल्या सामन्यात शाब्दीक चकमक उडाली होती. इटालियन फुटबॉल फेडरेशनने या घटनेची गंभीर दखल घेवून या दोन्ही फुटबॉलपटूंना दंड ठोठाविला आहे.
मैदानावर बेशिस्त वर्तन केल्याने इब्राहिमोव्हिकला 4000 युरोजचा तर लुकाकुला 3000 युरोजचा दंड करण्याचा निर्णय इटालियन फुटबॉल फेडरेशनने सोमवारी घेतला. त्याचप्रमाणे एसी मिलान संघाला 2000 आणि इंटर मिलान संघाला 1250 युरोजचा दंड केला आहे. 26 जानेवारी रोजी कोपा इटालिया फुटबॉल स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात इब्राहिमोव्हिक आणि लुकाकु यांच्यात जोरदार शाब्दीक चकमक उडाली होती.