वृत्तसंस्था/ दुबई
2022 च्या क्रिकेट हंगामातील पुरुषांच्या विभागात इमर्जिंग क्रिकेटपटू पुरस्कारासाठी आयसीसीने बुधवारी शिफारस केलेल्या क्रिकेटपटूंची यादी घोषित केली असून त्यामध्ये भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगचा समावेश आहे.
या पुरस्काराच्या शर्यतीमध्ये आता दक्षिण आफ्रिकेचा मार्को जान्सन भारताचा अर्शदीप सिंग, न्यूझीलंडचा फिन ऍलेन तसेच अफगाणचा इब्राहिम झद्रन यांचा समावेश आहे. अर्शदीप सिंगने 21 टी-20 सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व करताना 8.17 धावांच्या सरासरीने 33 बळी मिळवले. तसेच पॉवर प्ले व शेवटच्या काही षटकांमध्ये त्याची गोलंदाजी प्रभावी ठरली होती. न्यूझीलंडच्या दौऱयामध्ये अर्शदीपला वनडे क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी दिली होती. दक्षिण आफ्रिकेच्या जान्सनने 2022 च्या क्रिकेट हंगामात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या दौऱयावर कसोटी क्रिकेटमध्ये दर्जेदार कामगिरी करताना 14 बळी मिळवले. न्यूझीलंडविरुद्ध त्याने 9गडी बाद केले आहेत.