प्रतिनिधी/ पणजी
इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी डेल्हलपमेंट लिमिटेडच्या संचालक मंडळाची बैठक घेऊन त्यात राजधानीतील विविध प्रकल्पाचा आढावा घेण्यात आला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. तर पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात, महापौर उदय मडकईकर यांची बैठकिला उपस्थिती होती.
पणजी स्मार्ट सिटी अंतर्गत किती प्रकल्प झाले. अर्धवट आहेत आणि नवीन कोणते हाती घ्यावेत यावर चर्चा करण्यात आली. अर्धवट बंद प्रकल्प विकास कामे लवकर पुढे नेऊन पूर्ण करण्यावर भर देण्याचे ठरवण्यात आले. जवळ जवळ 2 वर्षांनंतर ही प्रथमच बैठक झाली आणि ती पुन्हा घेण्याचे ठरवून स्थगित करण्यात आली अशी माहिती सुत्रांनी दिली.