मुख्य नायिकेची भूमिका साकारण्याची संधी
बॉलिवूड अभिनेत्री संदीपा धर ‘हीरोपंती’ आणि ‘दबंग 2’ यासारख्या चित्रपटांसाठी ओळखली जाते. संदीपा आता लवकरच प्रसिद्ध दिग्दर्शक अन् निर्माता इम्तियाज अली याच्या आगामी वेबसीरिजमधून झळकणार असल्याचे वृत्त आहे. ही एक कॉमेडी वेबसीरिज असणार आहे. या वेबसीरिजचे दिग्दर्शन साजिद अली आणि अर्चित यांच्याकडून केले जाईल. या वेबसीरिजची पटकथा इम्तियाज अली यांनीच लिहिली आहे.
प्रत्येक कलाकारासाठी इम्तियाज अली यासारख्या अद्भूत कथाकारासोबत काम करण्याची एक संधी हवी असते, इम्तियाज हे कलाकारामधील सर्वोत्तम पैलू बाहेर आणण्यासाठी ओळखले जातात. त्यांच्या कथांची पात्रं पडद्यावर सुंदरपणे जिवंत होतात आणि मन-मेंदूत स्थान मिळवितात. एक व्यक्तीच्या स्वरुपात विशिष्ट आणि स्मरणीय ठरणाऱया भूमिकांची मी नेहमीच भुकेली राहिली असल्याचे संदीपाने म्हटले आहे.
आम्ही यापूर्वीच वेबसीरिजच्या प्रमुख हिस्स्यांचे चित्रिकरण पूर्ण केले आहे. मी स्वतःच्या भूमिकेबद्दल अत्यंत उत्सुक असून प्रेक्षकांसमोर ही सीरिज सादर करण्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असल्याचे ती म्हणाली.