जीवितहानी नाही – पोलिसांकडून तपास सुरू
वृत्तसंस्था/ इम्फाळ
मणिपूर राज्याची राजधानी इम्फाळमध्ये आयईडी स्फोट झाला आहे. बुधवारी सकाळी पूर्व इम्फाळच्या तेलीपटी भागात हा स्फोट झाला. दिलासाजनक बाब म्हणजे या स्फोटात कुठलीच जीवितहानी झालेली नाही. स्फोटानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासास प्रारंभ केला आहे. तसेच फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेट्रीच्या बॅलेस्टिक टीमने देखील घटनास्थळाची पाहणी केली आहे.
आयईडीद्वारे हा स्फोट घडवून आणला गेल्याचा संशय पोरोम्पत पोलीस स्थानकाच्या प्रभाऱयाने व्यक्त केला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून एका संशयिताची ओळख पटविली आहे. हा संशयित दुचाकी चालवत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले आहे. हा स्फोट एका गोदामाबाहेर झाला होता अश माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.