ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
इम्रान खान सरकारने 31 जानेवारीपर्यंत सन्मानपूर्वक सत्ता सोडावी. अन्यथा भव्य मोर्चाचे आयोजन करू, असा इशारा पीएमएल-एन आघाडीच्या नेत्या मरियम नवाज यांनी दिला आहे.
नवाज यांनी म्हटले आहे की, इम्रान सरकारने 31 जानेवारीपर्यंत पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा, अन्यथा विरोधी पक्षातील सर्व खासदार राजीनामा देतील. तसेच सरकारविरोधात भव्य मोर्चाचे आयोजन केले जाईल.
सरकारविरोधात आवाज उठवणाऱ्या डेमोक्रेटीक मुव्हमेंटच्या (पीडीएम) नेत्यांचा मुख्य हेतू नॅशनल रीकंसिलिएशन ऑर्डिन्ससारख्या सवलती मिळवण्याचा आहे. मात्र, मी त्यांना कोणतीही मूभा देणार नाही. पीएमएल-एन आघाडी पुर्णपणे भरकटली असून, त्यांच्यामुळे सरकारला कोणताही धोका नसल्याचे इम्रान खान यांनी म्हटले आहे.