अमिताभ बच्चन यांच्या आवाजाचे, व्यक्तिमत्त्वाचे चाहते जगभरात आहेत. दिवंगत इरफान खानही त्यापैकी एक. इरफान खानला जाऊन एक वर्षापेक्षा अधिक काळ होऊन गेलाय. कॅन्सरशी खूप दिवस झुंज दिल्यानंतर इरफानचं निधन झालं होतं. पण आज इरफान खान आपल्यात नसला तरी त्याच्या सिनेमांची आठवण काढणाऱया फॅन्सची संख्या कमी नाही. त्याची पत्नी सुतापा सिकंदरही इरफानसंदर्भातल्या अनेक आठवणी सोशल मीडियावर शेअर करीत असते. सुतापा या पोस्टमध्ये म्हणते, आज इरफानला जाऊन जवळ-जवळ दीड वर्ष झालं. पण आजही त्याच्या आठवणीनं रात्री झोपमोड होते. फेसबुकवर आजही त्याच्या आठवणींचा पूर ओसंडून वाहतोय. मलाही इरफानची एक अपूर्ण राहिलेली इच्छा आठवण म्हणून पोस्ट कराविशी वाटतेय. मला आठवतंय की आम्ही जेव्हा विद्यार्थी म्हणून शिकत होतो तेव्हापासून इरफान अमिताभ बच्चन यांच्या आवाजाचा फॅन होता. तो बच्चनजींचे बरेच संवाद हुबेहूब त्यांच्या स्टाईलमध्ये बोलून दाखवायचा. त्यानंतर इंडस्ट्रीत स्टारपद मिळवल्यानंतरही एके रात्री त्यानं मला बोलून दाखवलं, बच्चनजींचं सिलसिला सिनेमातलं ‘तुम होती तो ऐसा होता’ हे गाणं एकदातरी परफॉर्म करायचंय. पण त्याची ही इच्छा अपूर्णच राहिली अन् तो आपल्यातून निघून गेला.
Previous Articleडर्बीशायर क्रिकेट प्रमुखपदी मिकी आर्थर
Next Article पोवईनाका परिसरात युवकांमध्ये तुंबळ मारामारी
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.