13 पोलिसांचा मृत्यू
वृत्तसंस्था/ बगदाद
इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने इराकच्या किरकुक शहरातील एका तपासणी नाक्यावर हल्ला केला आहे. या हल्ल्यात 13 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. उत्तर इराकमध्ये अलिकडच्या काळात इस्लामिक स्टेटच्या हल्ल्यांमध्ये वाढ दिसून आली आहे.
इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेला पराभूत केल्याचे इराकच्या सरकारने 2017 च्या अखेरीस म्हटले होते. पण इस्लामिक स्टेटचे स्लीपर सेल सातत्याने सुरक्षा दलांना लक्ष्य करत आहेत. उत्तर इराकमध्ये सैन्य आणि पोलिसांना लक्ष्य करण्याचे प्रयत्न दहशतवाद्यांकडून सुरूच आहेत. यापूर्वी 19 जुलै रोजी इस्लामिक स्टेटने सादर शहराच्या अल-वोहेनात बाजारपेठेत हल्ला केला होता. या हल्ल्यात 30 जणांचा मृत्यू झाला होता.
इराकमध्ये आंतरराष्ट्रीय आघाडी सैनिकांची संख्या सद्यकाळात सुमारे 3,500 इतकी आहे. यातील 2,500 सैनिक अमेरिकेचे आहेत. हे सर्व सैनिक इस्लामिक स्टेटला पराभूत करण्यासाठी कार्यरत आहेत. तर अमेरिकेने अलिकडेच इराकमधील सैनिकांची संख्या कमी करणार असल्याची घोषणा केली आहे.
अमेरिकेचे सैन्य आता केवळ इराकच्या सुरक्षा दलांना प्रशिक्षण आणि सल्ला देण्याचे काम करणार आहे. मागील रविवारी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी इराकयच कुर्दिस्तानचा दौरा केला होता. या दौऱयादरम्यान त्यांनी इराक आणि सीरिया या दोन्ही ठिकाणी इस्लामिक स्टेट पुन्हा डोकं वर काढत असल्याचे म्हणत चिंता व्यक्त केली होती.