स्वतःच्या नौकेला केले लक्ष्य, 20 जणांचा मृत्यू
तेहरान : इराणच्या जमरान या युद्धनौकेने प्रेंडली फायरमध्ये चुकून नौदलाच्या कोनाराक या नौकेला लक्ष्य केले आहे. या घटनेत 20 पेक्षा अधिक खलाशांचा मृत्यू झाला आहे. कोनाराकवर 30-40 चालक सदस्यांचा समावेश होता. ही नौका अलिकडेच इराणच्या नौदलात सामील झाली होती.
दुर्घटनेत नौकेच्या कमांडरचाही मृत्यू झाला आहे. इराणच्या इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड्स कॉर्प्सने या घटनेला मानवी चूक ठरविले आहे. परंतु इराणच्या सैन्याकडून यासंबंधी अद्याप कुठलेच अधिकृत विधान प्राप्त झालेले नाही. जमरान युद्धनौका नव्या युद्धनौकाविरोधी क्षेपणास्त्राची चाचणी करत होता. या क्षेपणास्त्राच्या तावडीत कोनाराक ही मालवाहू नौका सापडली आहे.
क्षेपणास्त्र निश्चित वेळेपूर्वी डागण्यात आले होते. क्षेपणास्त्राच्या कक्षेतून कोनाराक युद्धनौका बाहेर पडली नव्हती. जखमी खलाशांना रुग्णवाहिकेच्या माध्यमातून रुग्णालयात हलविण्यात आले आहे. जानेवारी महिन्यात आयआरजीसीने चुकून तेहराननजीक युक्रेनचे एक प्रवासी विमान पाडविले होते. या घटनेत विमानातून प्रवास करणाऱया सर्व 176 जणांचा मृत्यू झाला होता.