वृत्तसंस्था/ तेहरान
इराणचा वेटलिफ्टर नवाब नसीरशेलाल याला ऑलिम्पिक स्पर्धेतील सुवर्णपदक तब्बल आठ वर्षानंतर मिळाले आहे. 2012 च्या लंडन ऑलिम्पिक स्पर्धेतील वेटलिफ्टिंग या क्रीडाप्रकारात पुरुषांच्या 105 किलो वजन गटात इराणचा नवाब नसीरशेलाल याला सुवर्णपदक मिळाले आहे.
2012 च्या लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत पुरुषांच्या 105 किलो वजन गटात युक्रेनच्या ओलेकसी टोरोखेटी याने सुवर्णपदक मिळविले होते. दरम्यान या स्पर्धेनंतर वेटलिफ्टरर्सची उत्तेजक चाचणी घेण्यात आली. या चाचणीमध्ये 105 किलो वजन गटातील पहिले चार वेटलिफ्टरर्स दोषी ठरल्याने त्यांना अपात्र ठरविण्यात आले. त्यामुळे या क्रीडा प्रकारात पाचव्या स्थानावर असलेल्या इराणच्या नवाबला सुवर्णपदक देण्याचा निर्णय घेण्यात आला. या क्रीडाप्रकारात पोलंडच्या बाँकला रौप्यपदक तर उझ्बेकच्या इप्रेमोव्हला कास्यपदक देण्यात आले आहे.