ऑनलाईन टीम / तेहरान :
मागील काही दिवसांपासून इराणी चलनाच्या किंमतीमध्ये होत असलेली घसरण थांबण्यासाठी इराणने आपले ‘रियाल’ हे चलन बदलून त्याऐवजी ‘तोमान’ हे चलन अधिकृत करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या चलनानुसार एका तोमानची किंमत 10 हजार रियाल असेल. एका इराणी वृत्तसंस्थेने याबाबतची माहिती प्रसिद्ध केली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 2015 मध्ये इराणबरोबरच्या अणुकरारामधून माघार घेण्याची घोषणा केल्यानंतर इराणच्या चलनाचे मुल्य घसरु लागले होते. तेव्हापासून इराणच्या चलनात मोठी घसरण होत गेली. ही घसरण रोखण्यासाठी इराणने चलन बदलण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सोमवारी इराणच्या संसदेमध्ये यासंदर्भातील विधेयक मंजूर करण्यात आले. इराणच्या राष्ट्रीय चलनामधून चार शून्य हटवण्याच्या प्रस्तावाला मंजूरी मिळाली आहे.
इराणने केंद्रीय बँक असणाऱ्या सेंट्रल बँक ऑफ इराणला चलन बदलण्यासाठी दोन वर्षांची मुदत दिली आहे.