वृत्तसंस्था/ तेहरान
आंतरराष्ट्रीय ज्युडो फेडरेशनने इराणवर चार वर्षांची बंदी घातली आहे. फेडरेशनच्या नियमावलींचा इराणकडून भंग होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला.
इराणच्या एका ज्युडोपटूवर इस्त्रायलच्या ज्युडोपटूशी लढत न देण्यासाठी दडपण आणण्यात आले. या कारणास्तव आंतरराष्ट्रीय ज्युडो फेडरेशनने आपल्या नियमावलीचे इराणकडून उल्लंघन झाल्याचे सांगितले. आंतरराष्ट्रीय ज्युडो फेडरेशनच्या नियंत्रण समितीने इराणवर बेमुदत कालावधीसाठी बंदी घालण्याचा निर्णय यापूर्वी घेतला होता. पण इराणने या निर्णयाविरुद्ध क्रीडा लवादाकडे दाद मागितली होती. क्रीडा लवादाने सुनावणीनंतर इराणवर चार वर्षांची बंदी घालण्याचा निकाल दिला.