टेस्लास टक्कर देण्याची तयारी : फोक्मसवॅगन, टोयोटा इलेक्ट्रिक कारवर करणार खर्च
वृत्तसंस्था /लॉस वेगास
आगामी येणाऱया कालावधीत जगातील कार उद्योगावर कोणाचा दबदबा राहणार, यासह अन्य मोठय़ा वाहन कंपन्यांची एकमेकांमधील वाढती स्पर्धा येत्या काळात प्रकर्षाने दिसणार आहे. दुचाकीपासून चारचाकी गाडीही इलेक्ट्रिक घेण्याकडे लोकांचा वाढता कल लक्षात घेऊन आगामी काळात या क्षेत्रात नव्या गाडय़ा उतरवण्यासाठी स्पर्धा आणखी रंगणार आहे.
यामध्ये अमेरिकन कंपनी टेस्ला सध्या एक नंबरची इलेक्ट्रिक कार कंपनी आहे. परंतु या कंपनीला टक्कर देण्याची मजबूत तयारी टोयोटा, फोक्सवॅगन आणि मर्सडिज बेंझ यासारख्या कंपन्या करत आहेत. या कंपन्या इलेक्ट्रिक कार विकसित करण्यावर अब्ज डॉलर्सचा खर्च करत असल्याचे दिसून येत आहे.
जगातील दोन मोठय़ा कंपन्या फोक्सवॅगन आणि टोयोटा मोटर कॉर्प यांच्यात करार करण्यात आला आहे. यात बॅटरीवर चालणाऱया कारचा जमाना आल्याने हा बदल होत जाणार आहे. यातील प्रमुख कंपन्यांचा आढावा पुढील प्रमाणे.
फोक्सवॅगन इलेक्ट्रिक कार निर्मितीवर खर्च
मागील महिन्यात या कंपनीने 12.64 लाख कोटी रुपयाच्या गुंतवणुकीची योजना आखली आहे. यामुळे वाहन उद्योगावर दबाव वाढत जाण्याची शक्यता आहे. फोक्सवॅगनने 9 डिसेंबर रोजी केलेल्या घोषणेत इलेक्ट्रिक कार निर्मितीसाठी 10 हजार कोटी डॉलर (7.43 लाख कोटी रुपये) करण्याचे म्हटले आहे.
टोयोटाचे 35 लाख ईव्ही कार विक्रीचे ध्येय
वर्ष 2021 च्या प्रारंभी 10 महिन्यात फोक्सवॅगनने 3.22 लाख इलेक्ट्रिक कारची विक्री केली आहे. तसेच टोयोटा दशक संपेपर्यंत वर्षाला 35 लाख इलेक्ट्रिक कार विकण्याचे ध्येय निश्चित करणार असल्याची माहिती आहे. यासाठी कंपनी आपले एक विशेष धोरण आखणार असल्याचीही माहिती आहे.
मर्सडिजची नवी कार 998 किमी एका चार्जवर धावणार
मर्सडिज बेंझने कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो(सीइएस2022)मध्ये इलेक्ट्रिक कार व्हिजन इक्युएक्सक्स सादर केली आहे. सदरची कार ही एका चार्जवर तब्बल 998 किमी धावणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. ही क्षमता चक्क टेस्लाच्या मॉडेल एसच्या 322 किमीच्या क्षमतेपेक्षा जास्त असणार आहे.