नवी दिल्ली : सोसायटी ऑफ मॅन्युफॅक्चर्स ऑफ इलेक्ट्रिक व्हेईकल्स (एमएसईव्ही)यांनी दिलेल्या माहितीनुसार आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये देशातील इलेक्ट्रिक वाहनांची विक्री 20 टक्क्यांनी घटून 2,36,802 वर राहिली आहे. एमएसईव्हीने स्पष्ट केलेल्या माहितीनुसार आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये दुचाकी इलेक्ट्रिक वाहनांची विक्री या अगोदरच्या तुलनेत 6
टक्क्यांनी घसरुन 1,43,837 युनिकवर राहिली. यामध्ये 40,836 वेगवान वाहनांचा समावेश होत असून दुसरीकडे कमी वेगवान वाहनांची संख्या ही 1,03,000 वर राहिली आहे. अन्य कंपन्यांमध्ये तीनचाकी वाहनांची विक्री ही 88,378 झाली होती, परंतु एक वर्षापूर्वी ही विक्री 1,40,683 इतकी होती. चारचाकी इलेक्ट्रिक वाहनांचा आकडा पाहिल्यास 2020-21 मध्ये 4,588 वाहनांची विक्री झाली आहे.