वृत्तसंस्था/ नवी दिल्ली :
देशातील इलेक्ट्रिक वाहानांची विक्री 2019-20 मध्ये तब्बल 20 टक्क्मयांनी वधारत 1.56 लाखाच्या घरात पोहोचली आहे. प्रामुख्याने दुचाकी वाहनांची विक्री वाढल्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्री तेजी पहावयास मिळाली आहे. यात ई रिक्षाचाही समावेश असल्याचे सोसायटी ऑफ मॅन्युफॅक्चर्स ऑफ इलेक्ट्रिक वाहने यांनी ही आकडेवारी सोमवारी सादर केली आहे.
2018-19 मध्ये एकूण इलेक्ट्रिक वाहन विक्री 1.3 लाख झाली होती. तर आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये एकूण वाहन विक्री 1.52 लाखाच्या घरात पोहोचली आहे. यात दुचाकी वाहने 3,400 कार आणि जवळपास 600 बसेस यांचाही यात समावेश आहे. हाच आकडा 2018-19 मध्ये 1.26 लाख दुचाकी वाहने आणि 3,600 कार व 400 बसची विक्री झाली होती. ई रिक्षाची सर्वाधिक विक्री झाली असून आतापर्यंत असंघटीत क्षेत्रात जास्त विक्री झाली असल्याचे म्हटले आहे.