नवी दिल्ली
इलेक्ट्रीक बस, निर्यातीवर सारं लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय अशोक लेलँड या व्यावसायिक वाहन क्षेत्रातील कंपनीने घेतला आहे. येणाऱया सप्टेंबरमध्ये कंपनी हलका ट्रक सादर करणार असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे. सध्या कंपनी इलेक्ट्रीक बसच्या निर्मितीसोबत निर्यातीत वाढ करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. देशात उत्पादन विक्रीवर तर भर असेलच पण त्यापुढे जाऊन जागतिक स्तरावर व्यावसायिक वाहनांच्या विक्रीचा विस्तार करण्याचा कंपनीचा मानस आहे. मध्य आशिया आणि आफ्रिकेत कंपनीने बस्तान बसवले आहे. आगामी 5 वर्षात आंतरराष्ट्रीय विस्ताराचे कंपनीचे धोरण असेल.