नवी आयोनिक कार लवकरच बाजारात
वृत्तसंस्था/ मुंबई
ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपनी हय़ुंडाई मोटर कॉर्पोरेशनने इलेक्ट्रीक व्हेईकल निर्मितीसाठी खास योजना केली असून पुढच्या वषी म्हणजे 2021 मध्ये इलेक्ट्रीक वाहनांना बाजारात आणले जाणार आहे. याचाच एक भाग म्हणून कंपनीने नवी ‘आयोनिक 5’ ही इलेक्ट्रीक कार 2021 च्या सुरूवातीलाच सादर करण्याची योजना आखली आहे.
इलेक्ट्रीक वाहनांना वाढणारं महत्त्व लक्षात घेऊन कंपनी या वाहनांवर लक्ष केंद्रीत करणार आहे. जागतिक स्तरावर इलेक्ट्रीक वाहनांच्या बाजारपेठेत कंपनीला आपला वाटा 10 टक्क्यांवर न्यायचा आहे. त्यासाठी कंपनीने आपली योजना शिस्तबद्ध रीतीने आखली आहे. पुढच्या वषी आयोनीक 5 या नव्या इलेक्ट्रीक वाहनाला विविध मॉडेलमध्ये कंपनी बाजारात उतरवणार आहे. ही एसयुव्ही गटातील दमदार गाडी प्रँकफर्ट ऑटो शोमध्ये सादर करण्यात आली होती. धोरण 2025 या अंतर्गत कंपनीने योजना आखली असून त्यासाठी आवश्यक त्या कार्यवाहीला सुरुवात झाली आहे. या नव्या धोरणासाठी उभी ठाकलेली आव्हाने दूर करून पुढे जाण्याचा कंपनीचा इरादा आहे. बाजारातील बदलाची दखल घेत आवश्यक उपाययोजना येत्या पाच वर्षांत कंपनी राबवणार आहे.