इशानला 15.25 कोटी, दीपक चहरला 14 कोटी तर श्रेयस अय्यरला 12.25 कोटी रुपयांचे करार
बेंगळूर / वृत्तसंस्था
आयपीएल मेगा ऑक्शनच्या पूर्वार्धात, शनिवारी पहिल्या दिवशी इशान किशन यंदाचा सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याला मुंबई इंडियन्सने 15.25 कोटी रुपयांच्या दिवसातील सर्वोच्च बोलीसह करारबद्ध केले. याशिवाय, दीपक चहरला चेन्नई सुपरकिंग्सने 14 कोटी रुपयांना करारबद्ध केले तर श्रेयस अय्यरशी कोलकाता नाईट रायडर्सने 12.25 कोटी रुपयांचा करार केला. अष्टपैलू शार्दुल ठाकुर 10.75 कोटी रुपयांच्या बोलीसह केकेआरच्या ताफ्यात दाखल झाला.
बिग-हिटिंग इशान किशनने गतवर्षी भारतीय संघातर्फे पदार्पण केले असून आयपीएलमध्ये तो सातत्याने मुंबई इंडियन्सतर्फेच खेळत आला आहे. अलीकडेच विंडीजविरुद्ध मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरलेल्या प्रसिद्ध कृष्णाला राजस्थान रॉयल्सने 10 कोटी रुपयांना करारबद्ध केले तर आणखी एक भारतीय खेळाडू वॉशिंग्टन सुंदर येथील करारामुळे 8.75 कोटी रुपयांनी ‘श्रीमंत’ झाला.
यजुवेंद्र चहलला राजस्थान रॉयल्सने 6.5 कोटी रुपयांना करारबद्ध केले. भारतीय संघातून बाहेर असलेल्या पण, नियमितपणे आयपीएल खेळत आलेल्या नितीश राणाला केकेआरने 8 कोटी रुपयांना आपल्या संघात कायम ठेवले तर राहुल त्रिपाठीला 8.50 कोटी रुपयांची बोली लाभली. प्रथमश्रेणी टी-20 क्रिकेटमधील टॉप फिनिशर म्हणून ओळखल्या जाणाऱया एम. शाहरुख खानला पंजाब किंग्सने तब्बल 9 कोटी रुपयांना करारबद्ध केले. राजस्थानचा वन सीझन वंडर राहुल तेवातियासाठी यंदा गुजरात टायटन्सने 9 कोटी रुपये मोजले.
थर्टी-फाईव्ह प्लस असलेल्या शिखर धवन (8.25 कोटी, पंजाब) व रविचंद्रन अश्विन (5 कोटी, राजस्थान) यांना मात्र फारशी बोली लाभली नाही. अन्य वरिष्ठ खेळाडूंमध्ये मोहम्मद शमीला गुजरात टायटन्सने 6.25 कोटी रुपयांना करारबद्ध केले. भुवनेश्वर कुमार 4.6 कोटी रुपयांसह आगामी लीगमध्ये सनरायजर्स हैदराबादतर्फे खेळेल, हे येथे निश्चित झाले.
महेंद्रसिंग धोनीच्या टेम्प्लेटप्रमाणे चेन्नई सुपरकिंग्सने आपल्या कोअर प्लेयर्सना रिटेन करण्यावर भर दिला आणि यातूनच त्यांनी दीपक चहरला संघात परत आणले. केकेआरने देखील हाच कित्ता गिरवत मागील हंगामातील 14 पैकी 11 खेळाडू कायम राखले. पण, अद्याप जलद गोलंदाजीच्या आघाडीवर त्यांना अव्वल खेळाडू आवश्यक आहे. त्यांनी कमिन्सला 7.25 कोटी रुपयांना करारबद्ध करत यादृष्टीने महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले. आश्चर्य म्हणजे मागील लिलावाच्या तुलनेत यंदा कमिन्सला निम्मीच रक्कम मिळू शकली आहे. कमिन्सकडे कर्णधारपद सोपवण्याचा या संघाचा विचार असला तरी तो पहिले दोन आठवडे उपलब्ध असणार नाही, हे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे.
असे संघ, असे खेळाडू!
चेन्नई सुपरकिंग्स
रिटेन खेळाडू ः रविंद्र जडेजा, महेंद्रसिंग धोनी, ऋतुराज गायकवाड, मोईन अली.
लिलावात खरेदी ः रॉबिन उत्थप्पा (2 कोटी), डेव्हॉन ब्रेव्हो (4.40 कोटी), अम्बाती रायुडू (6.75 कोटी), दीपक चहर (14 कोटी), तुषार देशपांडे (20 लाख)
मुंबई इंडियन्स
रिटेन खेळाडू ः रोहित शर्मा, जसप्रित बुमराह, सुर्यकुमार यादव, केरॉन पोलार्ड.
लिलावात खरेदी ः इशान किशन (15.25 कोटी), डेवाल्ड ब्रेव्हिज-द. आफ्रिका (3 कोटी), बसिल थंपी (30 लाख)
दिल्ली कॅपिटल्स
रिटेन खेळाडू ः रिषभ पंत, अक्षर पटेल, पृथ्वी शॉ, ऍनरिच नोर्त्झे.
लिलावात खरेदी ः डेव्हिड वॉर्नर (6.25 कोटी), मिशेल मार्श (6.50 कोटी), शार्दुल ठाकुर (10.75 कोटी), कुलदीप यादव (2 कोटी), सर्फराज खान (20 लाख)
रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर
रिटेन खेळाडू ः विराट कोहली, मोहम्मद सिराज, ग्लेन मॅक्सवेल
लिलावात खरेदी ः फॅफ डय़ू प्लेसिस (7 कोटी), हर्षल पटेल (10.75 कोटी), वणिंदू हसरंगा (10.75 कोटी), दिनेश कार्तिक (5.50 कोटी), जोश हॅझलवूड (7.75 कोटी), आकाश दीप (20 लाख), अनूज रावत (3.40 कोटी)
कोलकाता नाईट रायडर्स
रिटेन खेळाडू ः वरुण चक्रवर्ती, वेंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, सुनील नरेन.
लिलावात खरेदी ः पॅट कमिन्स (7.25 कोटी), श्रेयस अय्यर (12.25 कोटी), नितीश राणा (8 कोटी), शिवम मावी (7.25 कोटी), शेल्डॉन जॅक्सन (60 लाख)
राजस्थान रॉयल्स
रिटेन खेळाडू ः संजू सॅमसन, यशस्वी जैस्वाल, जोस बटलर.
लिलावात खरेदी ः आर. अश्विन (5 कोटी), ट्रेंट बोल्ट (8 कोटी), शिमरॉन हेतमेयर (8.50 कोटी), देवदत्त पडिक्कल (7.75 कोटी), प्रसिद्ध कृष्णा (10 कोटी), यजुवेंद्र चहल (6.50 कोटी), प्रियम गर्ग (20 लाख), रियान पराग (3.8 कोटी), केसी करिअप्पा (30 लाख)
सनरायजर्स हैदराबाद
रिटेन खेळाडू ः अब्दुल समद, उमरान मलिक, केन विल्यम्सन.
लिलावात खरेदी ः वॉशिंग्टन सुंदर (8.75 कोटी), निकोलस पूरन (10.75 कोटी), टी. नटराजन (4 कोटी), भुवनेश्वर कुमार (4.20 कोटी), अभिषेक शर्मा (6.50 कोटी), राहुल त्रिपाठी (8.5 कोटी), श्रेयस गोपाल (75 लाख), जे. सुचिथ (20 लाख)
पंजाब किंग्स
रिटेन खेळाडt ः मयांक अगरवाल, अर्शदीप सिंग.
लिलावात खरेदी ः शिखर धवन (8.25 कोटी), कॅगिसो रबाडा (9.25 कोटी), जॉनी बेअरस्टो (6.75 कोटी), राहुल चहर (5.25 कोटी), एम. शाहरुख खान (9 कोटी), हरप्रीत ब्रार (3.80 कोटी), इशान पोरेल (25 लाख), जितेश शर्मा (20 लाख)
गुजरात टायटन्स
रिटेन खेळाडू ः हार्दिक पंडय़ा, शुभमन गिल, रशिद खान.
लिलावात खरेदी ः मोहम्मद शमी (6.25 कोटी), जेसॉन रॉय (2 कोटी), लॉकी फर्ग्युसन (10 कोटी), अभिनव सदरंगनी (2.60 कोटी), राहुल तेवातिया (9 कोटी), नूर अहमद (गुजरात)
लखनौ सुपरजायंट्स
रिटेन खेळाडू ः केएल राहुल, रवी बिश्नोई, मार्कस स्टोईनिस.
लिलावात खरेदी ः क्विन्टॉन डी कॉक (6.75 कोटी), मनीष पांडे (4.60 कोटी), जेसॉन होल्डर (8.75 कोटी), दीपक हुडा (5.75 कोटी), कृणाल पंडय़ा (8.25 कोटी), मार्क वूड (7.50 कोटी), अवेश खान (10 कोटी), अंकित सिंग रजपूत (50 लाख)
कोण आहे मुंबईने 3 कोटींना करारबद्ध पेलेला डेवाल्ड ब्रेविस?
यू-19 क्रिकेट वर्ल्डकपमध्ये धावांची अक्षरशः बरसात करणाऱया दक्षिण आफ्रिकन युवा फलंदाज डेवाल्ड ब्रेविसससाठी मुंबई इंडियन्सने 3 कोटी रुपये मोजत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. आश्चर्य म्हणजे ब्रेविसने आपली बेस प्राईस फक्त 20 लाख रुपये इतकी ठेवली होती. डेवाल्ड ब्रेविसने यू-19 वर्ल्डकपमध्ये 6 सामन्यात 506 धावांची आतषबाजी करत शिखर धवनचा 18 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला होता. धवनच्या खात्यावर 2004 मध्ये 505 धावांचा विक्रम प्रस्थापित आहे. दक्षिण आफ्रिकेच्या या अव्वल, युवा फलंदाजांना बेबी एबी या टोपण नावाने ओळखले जाते.
‘ऑक्शनर’ हय़ूज कोसळले आणि सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला!
अनुभवी ऑक्शनर हय़ूज एडमेड्से या लिलावादरम्यान अचानक व्यासपीठावरच कोसळल्याने क्षणभर सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. कमी रक्तदाबामुळे ही घटना घडल्याचे आयपीएलने एका पत्रकाद्वारे कळवले. ‘आयपीएल लिलावादरम्यान हय़ूज एडमेड्से पोस्चरल हायपोटेन्शनमुळे दुर्दैवाने अचानक कोसळले. वैद्यकीय पथकाने त्यांच्यावर तातडीने उपचार केले आणि सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे’, असे आयपीएलने याप्रसंगी नमूद केले. हय़ूज यांच्या गैरहजेरीत चारु शर्मा यांच्याकडे सूत्रसंचालनाची धुरा सोपवली गेली.
60 वर्षीय हय़ूज यांचा रक्तदाब अचानक कमी झाला आणि ते कोसळले. सध्या त्यांच्यावर अधिक उपचार सुरु असून त्यांच्या प्रकृतीविषयी आणखी तपशील नंतर दिले जातील, असे मंडळाच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले. एडमेड्से यांनी जगभरात 2700 पेक्षाही अधिक लिलावांमध्ये मुख्य सूत्रसंचालनाची धुरा सांभाळली असून विशेषतः अलिशान कार लिलावात ते प्रामुख्याने ऑक्शनर म्हणून काम पाहतात. जेम्स बाँडच्या चित्रपटात ऍस्टॉन मार्टिनने वापरलेल्या कारचा लिलावही त्यांच्या अखत्यारीतच पार पडला. शनिवारी लंकन लेगस्पिनर वणिंदू हसरंगाचा लिलाव सुरु असताना ते ऑक्शन पेडेस्टलवरुन अचानक कोसळले.
कोट्स
‘मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात पुन्हा एकदा दाखल होता आले, याचा मला विशेष आनंद आहे. मला त्यांनी नेहमी कुटुंबियाप्रमाणेच वागवले असून पुन्हा एकदा पथकात स्थान दिल्याबद्दल मी त्यांचा विशेष आभारी आहे. यापुढेही सर्वोत्तम कामगिरी साकारणे, हेच माझे मुख्य लक्ष्य असेल’.
-मुंबई इंडियन्सशी करारबद्ध झालेला इशान किशन
बॉक्स
10 कोटी रुपयांसह अवेश खान सर्वात महागडा अनकॅप्ड खेळाडू!
आयपीएलच्या या मेगा ऑक्शनमध्ये अनकॅप्ड खेळाडूंवर देखील बरीच दौलतजादा झाली! अवेश खानला लखनौ प्रँचायझीने 10 कोटी रुपयांना करारबद्ध केले आणि आयपीएल इतिहासात तो सर्वात महागडा अनकॅप्ड खेळाडू ठरला. यापूर्वी हा विक्रम गौतमच्या खात्यावर होता. चेन्नईने मागील लिलावात त्याला 9.25 कोटी रुपयांना खरेदी केले होते.
इशान किशन 15.25 कोटी मुंबई इंडियन्स
दीपक चहर 14 कोटी चेन्नई सुपरकिंग्स
श्रेयस अय्यर 12.25 कोटी केकेआर
हर्षल पटेल 10.75 कोटी आरसीबी
वणिंदू हसरंगा 10.75 कोटी आरसीबी
निकोलस पूरन 10.75 कोटी हैदराबाद
शार्दुल ठाकुर 10.75 कोटी दिल्ली कॅपिटल्स प्रसिद्ध कृष्णा 10 कोटी राजस्थान रॉयल्स