प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा व कोकण नगर येथे इसिस या दहशवादी संघटनेचे लोक राहून गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आह़े नुकतेच कर्नाटक येथे इसिस संघटनेवर करण्यात आलेल्या कारवाईत रत्नागिरीचे नाव पुढ आले होत़े त्यानुसार रत्नागिरीमधील गुप्तचर यंत्रणा अलर्ट झाली असून स्लिपर सेल म्हणून काम करणाऱया संघटनांवर बारीक नजर ठेवण्यात येत आह़े
जानेवारीत गुप्तचर यंत्रणेचे काही लोक मिरकरवाडा व कोकण नगर येथे येऊन गेले. हे दहशतवादी जे चार पाच दिवस राहिले होते. ते उडपी मार्गे रेल्वेने जाताना त्यांना अटक करण्यात आली होती.अशी देखील माहिती आता समोर आली आह़े रत्नागिरी सारख्या शांतताप्रिय जिह्यात दहशतवादी येऊन राहतात. त्यामुळे एक सगळीकडे एक मोठय़ा प्रमाणात दहशत पसरली असून आपण किती सुरक्षित आहोत का याचाही विचार जनतेने करायला हवा.
जानेवारी महिन्यात रत्नागिरी आलेल्या गुप्तचर यंत्रणेचा काही अधिकाऱयांनी रत्नागिरी मिरकरवाडा व कोकण नगर येथे काही भागात भेट देवून चौकशी केली होत़ी इसिस च्या हालचाली गुजरात मधील जांबुसान आधी ठिकाणी दहशतवादी आपले बस्तान बसवण्याचा तयारीत आहेत. दरम्यान संघटनेच्या काही अतिरेक्यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने अटक केल्यानंतर ही माहिती समोर आली आहे संघटनेच्या काही अतिरेक्यांना अतिरेक्यांनी ऑल इन अतिरेक्याने देश राज्यातील राजकीय नेते पोलीस अधिकारी सरकारी अधिकारी काही सेलिब्रिटींची हत्या करण्याची योजना आखली होती अशी माहिती आहे.
इसिस च्या या जागतिक संघटनेचे रत्नागिरी जिह्यात पाय पसरवाण्याचा हेतू असून अशी गुप्त माहिती आमच्यापर्यंत आली आहे.इसिस ची दक्षिण भारतात बस्तान बसवण्याची योजना आहे. या अतिरेक्यानी कर्नाटक राज्यातील गुंडल पेट आणि शिवान समुद्र जंगलात प्रशिक्षण घेतले याची तयारी केली. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या या आरोपपत्रात ही माहिती दिली दिली. असून कर्नाटकातील कोडगु कोलार, केरळ, महाराष्ट्रातील रत्नागिरी गुजरात मधील जांभूसान आदी ठिकाणी दहशतवाद्यांनी बस्तान बसण्याची तयारी केली आहे. काही अतिरेक्यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने अटक केल्यानंतर त्यांच्या चौकशीदरम्यान बरीच माहिती उघड झाली आहे.
रत्नागिरी जिह्याच्या किनाऱयावर इसिस च्या हालचाली सुरू असून पोलिस यंत्रणेसोबत गुप्तचर यंत्रणाही हायअलर्ट वर गेली आहे. रत्नागिरी जिह्याच्या समुद्रकिनारी इसिस आपले पाय पसरवत आहे अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे. कर्नाटक येथील राष्ट्रीय तपास यंत्रणेने इसिस छावण्यांवर करण्यात आलेल्या कारवाईत ही माहिती समोर आली आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्हा पोलिस दलात सोबतचा गुप्तचर यंत्रणाही कामाला लागली आहे दरम्यान अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांनी सांगितले की जिह्यातील एकही इसिस चे सदस्य नाहीत मात्र पोलिस दलातील सर्व यंत्रणा अलर्ट अनुषंगाने ठेवण्यात आल्या आहेत.