इसूजू मोर्ट्स इंडियाकडून संपूर्ण देशभरात ‘इसूजू आयकेअर विंटर सर्व्हिस कॅम्प’ सुरु करण्यात येणार आहे. सदरचा कॅम्प कंपनीच्या इसूजू डी मॅक्स पिक अप आणि एसयूव्ही रेंजसाठी राहणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. कंपनीने ग्राहकांना विशेष लाभ मिळवून देण्यासाठी कॅम्पचे आयोजन केले आहे. 13 ते 24 डिसेंबर 2021 च्या दरम्यान ‘इसूजूकेअर’चे विंटर सर्व्हिस कॅम्प होणार आहे. सर्व अधिकृत डिलर सर्व्हिस आउटलेट्सवर कॅम्प करण्यात येणार आहे.
विविध ठिकाणी कॅम्प ः कॅम्प अहमदाबाद, अनंतपूर, बेंगळूर, बिमावरम, भूज, कालीकत, चेन्नई, कोईमतूर, दिल्ली, दीमापूर, गांधीधाम, गोरखपूर, गुवाहाटी, हैदराबाद, इंदोर, जयपूर आदी शहरांमध्ये होणार आहे.