बेळगाव / प्रतिनिधी
आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन)च्यावतीने आयोजित केली जाणारी जगन्नाथ रथयात्रा गुरुवारी दुपारी दीड वाजता धर्मवीर संभाजी चौकातून मार्गाक्रमण करणार आहे. बेळगाव जिल्हा आणि देशाच्या विविध भागातून आलेले इस्कॉनचे हजारो भक्त या रथयात्रेत सहभागी होणार आहेत.
या रथयात्रेच्या निमित्ताने धर्मवीर संभाजी चौकात दुपारी एक वाजता देश-विदेशातून आलेल्या ज्ये÷ संन्याशांची थोडक्मयात प्रवचने होतील आणि ते रथयात्रेला चालना देतील. रथामध्ये भगवान जगन्नाथ, त्यांचे बंधू बलराम आणि भगिनी सुभद्रा यांचे आर्च विग्रह ठेवलेले असतील. त्यांच्यासमोर इस्कॉनचे संस्थापक आचार्य श्रील प्रभूपाद यांचा पुतळा ठेवलेला असेल. रथाला जोडलेले दोरखंड ओढत भक्तगण हा रथ संभाजी चौकातून कॉलेज रोड, समादेवी गल्ली, खडेबाजार, गणपत गल्ली, मारुती गल्ली, किर्लोस्कर रोड, रामलिंग खिंड गल्ली, पाटील गल्ली, रेल्वेओव्हर ब्रिज वरून कपिलेश्वर रोड मार्गे खडेबाजार शहापूर, आयुर्वेदिक कॉलेज रोडवरून गोवावेस मार्गे सायंकाळी सहा वाजता टिळकवाडीतील इस्कॉन मंदिराकडे पोहोचेल. तेथे रथयात्रेची सांगता होईल. रथयात्रेवर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी केली जाईल. या रथयात्रेच्या अग्रभागी रंगोली काढणारे पथक असेल. त्यापाठोपाठ शृंगारलेल्या बैलजोडय़ा, भजन-कीर्तनमध्ये तल्लीन झालेले हजारो भक्त भगवान श्रीकृष्णाचा नामोच्चार करीत पुढे सरकतील.
जगाच्या विविध भागात आता रथयात्रा होत असून बेळगावच्या रथयात्रेला विशेष महत्त्व आहे. अभूतपूर्व उत्साह असलेली ही रथयात्रा म्हणजे जनतेला दर्शन देण्यासाठी साक्षात भगवंतच रस्त्यावर उतरलेले दिसतील. ठीकठिकाणी फळे, सरबत व पाणी वितरण केले जाईल. सायंकाळी इस्कॉन मंदिराच्या पाठीमागच्या बाजूस उभारलेल्या विविध स्टॉल्सवर खाद्यपदार्थांची व इस्कॉनच्या विविध उपक्रमांची माहिती देणारी रेलचेल असेल, भजन, प्रवचन, कीर्तन आणि ज्ये÷ संन्याशांची प्रवचने व नाटय़लीला होईल. रात्रााr सर्वांसाठी महाप्रसाद होईल.
दुसऱया दिवशी म्हणजे 31 जानेवारी रोजी दुपारी 4 नंतर वैष्णव यज्ञ व इतर उपक्रम होतील तसेच रात्री सर्वांना महाप्रसाद होईल. या सर्व उपक्रमात जनतेने मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन इस्कॉनचे अध्यक्ष परमपूज्य भक्ती रसामृत स्वामी महाराज यांनी केले आहे.