वृत्तसंस्था/ पणजी
2021-22 इंडियन सुपर लीग फुटबॉल हंगामातील उर्वरित सामन्यांसाठी इस्ट बंगाल एससी संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी मारिओ रिव्हेरा यांची नियुक्ती केल्याची घोषणा शनिवारी करण्यात आली.
इंडियन सुपर लीग उर्वरित फुटबॉल हंगामात आता रिव्हेरा यांचे इस्ट बंगालच्या खेळाडूंना मार्गदर्शन लाभणार आहे. गेल्या महिन्यात जोस मॅन्युअल डायझ यांनी या क्लबच्या प्रमुख प्रशिक्षकपदाचा त्याग केल्यानंतर रेनेडी सिंग यांची हंगामी प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली होती. यापूर्वी रिव्हेरा यांच्या मार्गदर्शनाखाली इस्ट बंगाल संघाने आय लीग फुटबॉल स्पर्धेच्या गेल्या दोन हंगामात दुसरे स्थान मिळविले होते. 2021-22 च्या इंडियन सुपर लीग फुटबॉल हंगामात इस्ट बंगालने 7 सामन्यांतून गुणतक्त्यात दुसरे स्थान मिळविले आहे. आता इस्ट बंगालचा या स्पर्धेतील पुढील सामना येत्या मंगळवारी बेंगळूर एफसी संघाविरुद्ध बाबोंळीच्या स्टेडियममध्ये खेळविला जाणार आहे.