वृत्तसंस्था/ कोलकाता
कोलकाताचा बलाढय़ फुटबॉल क्लब इस्ट बंगालने आपल्या संघाच्या प्रशिक्षकपदाची धुरा मारिओ रिव्हेराकडे यापुढे कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. इस्ट बंगाल क्लब आणि बेंगळूरचा इन्व्हेस्टर क्वेस कार्पोरेशन लिमिटेड यांच्यात चार दिवसांपूर्वी फारकत झाली होती. या घटनेनंतर पुढील फुटबॉल हंगामासाठी इस्ट बंगालचे प्रशिक्षकपद रिव्हेरा यांच्याकडे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
आय लीग फुटबॉल स्पर्धेतील 29 फेब्रुवारी रोजी सॉल्ट लेक स्टेडियमवर इस्ट बंगाल आणि चर्चिल ब्रदर्स यांच्यातील झालेला सामना 1-1 असा बरोबरीत राहिला होता. आता आय लीग स्पर्धेत पुढील हंगामात इस्ट बंगालला रिव्हेरो यांचेच मार्गदर्शन लाभणार आहे.