जेरुसलेम
इस्त्राइल आणि पॅलेस्टाइन यांच्यात पुन्हा अशांततेचे धुमारे घुमण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. यासंदर्भात संयुक्त राष्ट्राचे पश्चिम आशियासंबंधीत विशेष समन्वयक टोर वेनेसलँड यांनी पुन्हा संघर्षाची शंका व्यक्त केली आहे. एकंदरच याबाबतीत समन्वयाची गरज असल्याची बाब त्यांनी अधोरेखीत केली आहे. इस्त्राइल आणि पॅलेस्टाइन या दोन्ही देशातील संबंधात तणावाने जागा मिळवली असून यातूनच भडका उडू शकतो, असा इशारा देण्यात आला आहे. यासंदर्भात दोन्ही बाजुकडून योग्य तो निर्णय लवकरात लवकर घेतला गेला नाही तर नजिकच्या काळात पुन्हा दोन्ही देशात हिंसाचार भडकू शकतो. मागच्या महिन्यातच ब्रिटनने पॅलेस्टाइन संघटना हमासला अतिरेकी संघटना म्हणून घोषित केले होते. ब्रिटनच्या गृहमंत्री प्रीती पटेल यांनी हमास संघटनेवर निर्बंध जारी केले होते. या संघटनेकडे धोकादायक, आधुनिक शस्त्रs असून शिवाय अतिरेकी प्रशिक्षणाची व्यवस्थाही असल्याची माहिती आहे. इस्त्राइलसह याआधी अमेरिका आणि युरोपियन संघानेदेखील हमासला अतिरेकी संघटना म्हणून घोषित केले आहे. तेव्हा सद्यस्थितीत दोन्ही देशात शांती राहणे आवश्यक आहे.