जेरुसलेम
इस्रायलने अलीकडेच जर्मनीकडून तीन अत्याधुनिक पाणबुडय़ा खरेदी केल्या असल्याची माहिती आहे. सदरच्या खरेदीचा व्यवहार हा 3.4अब्ज डॉलर्स रुपयांचा झाला असल्याची माहिती आहे. इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाच्या वरि÷ अधिकाऱयांकडून या संदर्भातली माहिती देण्यात आली आहे. अधिकाऱयांच्या म्हणण्यानुसार सदरच्या पाणबुडय़ांची निर्मिती ही जर्मनीतील थायसन प्रुप समूहाकडून करण्यात आली आहे. डिझेल-इलेक्ट्रिकवर आधारित ही पाणबुडी आहे. पुढील नऊ वर्षाच्या कार्यकाळात सदरच्या पाणबुडय़ांचा पुरवठा टप्प्याटप्प्याने इस्रायलला केला जाणार असल्याचे समजते. तीन पाणबुडय़ांच्या माध्यमातून इस्रायलची संरक्षणसंबंधीत ताकद आणखी वाढण्यास मदत होणार आहे. सदरच्या येणाऱया खर्चातला काहीसा वाटा सरकार स्वतः उचलणार असल्याचे सांगण्यात आले आहे.