प्रतिनिधी / बेंगळूर
बेंगळूरमधील वैद्यकीय महाविद्यालयांची इस्पितळे आणि खासगी इस्पितळांनी 80 टक्के बेड कोविड रुग्णांसाठी राखून ठेवणे सक्तीचे आहे, असा आदेश आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी दिला आहे. सर्व खासगी इस्पितळांनी सूचविलेल्या दरानूसारच रुग्णांवर उपचार करावेत, असेही त्यांनी सांगितले.
बेंगळूरमध्ये कोरोनाचा कहर झाला असून रुग्णांवर उपचार करण्यासाठी सरकारी, वैद्यकीय महाविद्यालयांमधील इस्पितळे आणि खासगी इस्पितळांमध्ये बेड राखून ठेवणे सक्तीचे आहे. संसर्गजन्य रोग नियंत्रण कायद्यानुसार बेंगळूरमधील सर्व 13 सरकारी इस्पितळे आणि खासगी इस्पितळांनी डायलिसिस, मेटर्निटीसंबंधीचे बेड वगळता उर्वरित सर्व बेड कोविड रुग्णांसाठी राखून ठेवावेत. त्यामुळे तीन-चार दिवसांत 7 हजार बेड उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती डॉ. के. सुधाकर यांनी दिली.