वाढत्या रुग्ण संख्येमुळे कर्नाटकात निर्णय, कोरोनाबाधितांची संख्या आणखी वाढणार
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगावसह कर्नाटकात कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाटय़ाने वाढ होत आहे. बुधवारी सायंकाळी उपलब्ध झालेल्या माहितीनुसार कर्नाटकातील बाधितांची संख्या 4 हजार 63 वर पोहोचली आहे. वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन जर सरकारी इस्पितळात जागा पुरली नाही तर बाधितांवर घरीच उपचार करण्यासाठी केंद्र सरकारने परवानगी दिली आहे.
मुंबईसह वेगवेगळय़ा राज्यांतून चाकरमान्यांचे लोंढे कर्नाटकात दाखल होत आहेत. त्यांना 14 दिवस क्वारंटाईनमध्ये ठेवून त्यांची स्वॅब तपासणी केली जात आहे. मुंबईसह महाराष्ट्रातून आलेल्या चाकरमान्यांमुळे कर्नाटकात बाधितांची संख्या वाढत चालली आहे. रोज 200 चा आकडा पार होत आहे. त्यामुळे जर इस्पितळे पूर्ण भरली तर बाधितांवर घरीच उपचार करण्यासाठी सरकारने परवानगी दिली असल्याची माहिती मिळाली आहे.
ज्यांना लक्षणे दिसून येतात, ज्यांची आरोग्य स्थिती नाजूक बनते तशा रुग्णांवरच इस्पितळात उपचार करायचे. लक्षणे नसूनही ज्यांचा अहवाल पॉझिटिव्ह येतो अशा रुग्णांवर गरज पडल्यास त्यांच्या घरीच उपचार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चालू महिन्या अखेरपर्यंत कर्नाटकातील बाधितांची संख्या 10 हजाराचा आकडा पार करणार अशी भीती आहे. जर तशी परिस्थिती निर्माण झाली तर घरातच उपचाराचा पर्याय स्वीकारण्यात येणार आहे.
आरोग्य विभागाने यासाठी आवश्यक तयारी केली आहे. उपलब्ध माहितीनुसार कर्नाटकातील इस्पितळात वेगवेगळय़ा इस्पितळातून 86 हजार 425 खाट उपलब्ध आहेत. यापैकी 25 हजारांहून अधिक खाट कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. जर ही संख्या वाढली तर उर्वरित सामान्य रुग्णांची गैरसोय होणार आहे. त्यामुळेच लक्षणे नसणाऱया व ज्यांच्या आरोग्याला धोका कमी आहे अशा रुग्णांवर घरीच उपचार करण्याचा सल्ला कोविड-19 कार्य पथकाने दिला आहे.
आयसीएमआरनेही (भारतीय वैद्यकीय संशोधन मंडळ) या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखविला आहे. कर्नाटकातील सद्यस्थिती लक्षात घेऊन क्वारंटाईनची मुदत 14 दिवसांऐवजी 7 दिवसांवर करण्यात आली आहे. या काळात त्यांना लक्षणे दिसून आली नाही तर त्यांना घरी पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णयच आता धोक्मयाचा ठरू लागला आहे.
बेळगाव जिह्यात अथणी, हुक्केरी व बेळगाव तालुक्मयात क्वारंटाईनमधून ज्यांना घरी पाठविण्यात आले होते त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढतो आहे. गरज भासल्यास बाधितांवर घरीच उपचार करण्याच्या सल्ल्यावर आरोग्य विभागाने अनेक तज्ञांचे मत घेतले असून त्यांनीही हा निर्णय योग्य असल्याचा शिक्कामोर्तब केला आहे.
जर रुग्ण संख्या वाढली तर हा पर्याय स्वीकारण्यात येणार
कर्नाटकात कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी 577 इस्पितळे निश्चित करण्यात आली आहेत. ज्यांना श्वसनाचा त्रास उद्भवतो त्यांच्यासाठी 2 हजारांहून अधिक खाट वेगवेगळय़ा इस्पितळातील आयसीयुमध्ये आरक्षित करण्यात आले आहे. तर बाधितांवर उपचारासाठी 25 हजारांहून अधिक खाट राखीव ठेवण्यात आले आहेत. व्हेंटीलेटरची संख्या मात्र केवळ 988 इतकी आहे. आरोग्य विभागाच्या वरि÷ अधिकाऱयांशी संपर्क साधला असता सध्या बाधितांवर घरात उपचार करण्याइतकी परिस्थिती आपल्याकडे हाताबाहेर गेली नाही. जर रुग्ण संख्या वाढली तर हा पर्याय स्वीकारण्यात येणार आहे, असे अधिकाऱयांनी सांगितले.
बेळगावात 200 खाट राखीव
सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधितांसाठी वैद्यकीय विभागात 200 खाट राखीव ठेवण्यात आले आहेत. सध्या या विभागात उपचार घेणाऱया रुग्णांची संख्या 97 च्या घरात आहे. प्रसुती विभागासमोर नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीत आणखी 200 खाट तयार ठेवण्यात आले आहेत. ऑक्सिजन पुरवठय़ासाठी स्वतंत्र सिलिंडर उभे करण्यात आले आहेत. तर आयसीयुमध्ये 50 खाट उपलब्ध आहेत. व्हेंटीलेटरचीही व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र संपूर्ण राज्यात केवळ 12 रुग्णांची प्रकृती खालावल्याने त्यांना आयसीयुमध्ये ठेवावे लागले आहे, अशी माहिती बिम्समधील सुत्रांनी दिली आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पुरेशी व्यवस्था असल्यामुळे बेळगावची परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही, असा विश्वास वरि÷ अधिकाऱयांनी बोलून दाखविला.