गाझा
इस्रायल देशात मागील काही दिवसांपासून कोणत्या ना कोणत्या कारवाया होत आलेल्या आहेत. यामध्ये मागील चोवीस तासामध्ये तर इस्रायलमधील गाझा शहरात दुसऱयांदा रॉकेट हल्ला केल्याची माहिती आहे. परंतु सदरच्या घटनेवर इस्रायल सैन्याने दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी फलस्तीनी या दहशतवाद्यांनी देशातील दक्षिणेकडील काही भागात रॉकेटचा मारा केला असल्याचे सांगितले आहे. मात्र या घटनेत अधिक प्रमाणात कोणत्याही प्रकारची जीवीत हानीसह आर्थिक नुकसान झाले नसल्याचेही यादरम्यान नमूद केले आहे. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायली लडाऊ जेट आणि हेलिकॉप्टरनी गाझापट्टीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये दहशतवादी संघटना हमासची जवळपास पाच ठिकाणे टार्गेट केल्याचे ही म्हटले आहे. इस्रायली सैन्याच्या माहितीनुसार एक प्रशिक्षण केंद्र, हत्यार निर्मिती पेंद्र, एक कारखाना आदींना नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
मात्र कोणत्या ठिकाणाचे किती प्रमाणात नुकसान झाले आहे, याची नोंद नसल्याची माहिती आहे.