इस्लामपूर नगरपरिषदेच्या मुख्याधिकार्यांना जीवे मारण्याची धमकी देवून झाला होता फरारी
प्रतिनिधी/शाहूवाडी
इस्लामपूर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांच्या अंगावर धावून त्यांना जीवे मारण्याची धमकी देवून फरारी झालेला स्वीकृत नगरसेवक खंडेराव जाधवास शाहुवाडी पोलिसांनी आंबा (ता. शाहूवाडी) येथे एका रिसॉर्टमधून ताब्यात घेतले. शाहुवाडीचे स.पो.नि भालचंद्र देशमुख यांच्या पथकाने इस्लामपूरचे पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या सुचनेनुसार ही कारवाई केली.
दरम्यान शाहूवाडी पोलिसांचे खास पथक मिळालेल्या माहितीनुसार फरारी आरोपी नगरसेवक खंडेराव जाधव याचा गेल्या दोन दिवसांपासून शोध घेत होते. शाहूवाडी पोलिसांच्या पथकाने त्याने आश्रय घेतलेल्या आंबा येथील एका रिसॉर्टवर धाड टाकून त्याला ताब्यात घेतले. रविवारी पहाटेच्या सुमारास आरोपीला इस्लामपूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.