प्रतिनिधी /इस्लामपूर
महाराष्ट्र राज्याचे नगरविकास व बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे शनिवारी सांगली जिल्ह्याच्या दौर्यावर आले होते. यावेळी उरूण इस्लामपुर शहराच्या विविध विकासकामाबाबत सांगली जिल्हा शिवसेना प्रमुख व इस्लामपुरचे नगरसेवक आनंदराव पवार व इस्लामपुरचे नगराध्यक्ष व भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी शहरातील विकासकामांच्या निधीबाबत सांगली येथे समक्ष भेटुन संवाद साधला.
यावेळी माळतळ येथे उभारण्यात येत असलेल्या भाजीमंडई व वहानतळ विकसीत करण्यासाठी १५ कोटी, शहरातील रस्ते विकासासाठी १० कोटी निधी राज्य सरकार देईल असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले तर शहरातील भुयारी गटर योजनेला तात्काळ सुरुवात करण्याबाबत योग्य ते उचित आदेश संबधीत विभागाला व अधिकार्यांना देणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
याच बरोबर शहरातील विकासकामांचा व प्रलंबीत कामाचा आढावा घेऊन शहराच्या प्रलंबीत कामासाठी व नव्याने सुरु होणार्या विकासकामाबाबत आवश्यकतेनुसार निधी दिला जाईल, असे ही शेवटी शिंदे यांनी सांगितले. यामुळे माळतळ येथे नव्याने सुरु होत असलेल्या भाजीमंडई,वहानतळ या कामाला गती मिळणार आहे. तर भुयारी गटरचे काम ही आता गतीने सुरु होईल.या आश्वासनामुळे शहरातील नागरीकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.