थिरुवनंतपुरम / वृत्तसंस्था
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांची माहिती इस्लामी दहशतवाद्यांना पुरविणाऱया पोलिस अधिकाऱयाला केरळमध्ये निलंबित करण्यात आले आहे. या पोलिसाने ही माहिती पोलिसांच्याच डाटाबेसमधून चोरुन इस्लामी दहशतवादी संघटनांना दिल्याचे उघड झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. ही माहिती प्रामुख्याने सोशल डेमॉक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया (एसडीपीआय) या संघटनेला देण्यात येत होती. ही संघटना दहशतवादाशी निगडीत असल्याचा आरोप आहे.
निलंबित पोलिस अधिकाऱयाचे नाव पी. के. अनस असे आहे. त्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांची, पोलिसांनी गोळा केलेली खासगी आणि संवेदनशील माहिती चोरटय़ा मार्गाने मिळविली आणि ती एसडीपीआयला पुराविली, अशी माहिती पोलिसांनी दिली. एका अन्य प्रकरणात एसडीपीआयच्या एका कार्यकर्त्याला अटक करण्यात आली होती. त्याने चौकशीच्या वेळी अनस याचा भांडाफोड केला. त्यावरुन अनस याला निलंबित करण्यात आले आहे.
एसडीपीआय ही संघटना वास्तवात पॉप्युलर प्रंट ऑफ इंडिया या बंदी घातलेल्या संघटनेची राजकीय शाखा आहे. पॉप्युलर प्रंट ऑफ इंडिया ही संघटना इस्लामी दहशतवादाची संबंधित असल्याचे उघड झाल्यानंतर तिच्यावर बंदी घालण्यात आली होती. तथापि, एसडीपीआय संघटना अद्याप कार्यरत आहे.
प्रकरण अतिशय गंभीर
ज्या प्रकरणामुळे हा प्रकार उघडकीस आला ते गंभीर आहे. इडुक्की जिल्हय़ातील थोडुपुडा येथे मधुसूदन नामक एका बस कंडक्टरला इस्लामी कट्टरवाद्यांनी बेदम मारहाण केली होती. या कंडक्टरच्या एका कथित फेसबुक संदेशामुळे हे कट्टरपंथी संतप्त झाले होते. कंडक्टरने ईशनिंदा केली आहे, असा त्यांचा समज होता. त्यामुळे इस्लामी नियमांच्या अनुसार ते त्याला शिक्षा करणार होते. हा कंडक्टर आपली पत्नी आणि मुलांसह प्रवास करत असताना त्याला बस थांबवून खाली उतरवून या कट्टरपंथीयांनी बेदम मारहाण करण्यास सुरवात केली होती. त्याचवेळी तेथे वाहतूक पोलिस अधिकारी पोहचल्याने मारहाण करणारे पळून गेले. याच भागात काही वर्षांपूर्वी अशाच दहशतवाद्यांनी अल्लाची निंदा केल्याच्या समजावरुन एका ख्रिश्चन प्राध्यापकाचा हात तोडला होता.
बस कंडक्टरला मारहाण केलेल्या आरोपींना जेव्हा पकडण्यात आले तेव्हा, या आरोपींनी पी. के. अनल हा आपल्या संपर्कात आहे आणि त्यानेच या कंटक्टरविषयी माहिती दिल्याची कबुली दिली. पोलिसांनी अनस याच्या मोबाईलची तपासणी केली तेव्हा त्याचे बिंग बाहेर पडले. नंतर पुढील कारवाई करण्यात आली.