कैरो / वृत्तसंस्था
ईजिप्त देशात शुक्रवारी दोन रेल्वे एकमेकांवर आदळून झालेल्या भीषण अपघातात किमान 32 जण ठार झाल्याचे वृत्त आहे. किमान 66 जण जखमी असून त्यांपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. हा अपघात दक्षिण ईजिप्तमध्ये झाला. ईजिप्तमधली रेल्वे यंत्रणा जुनाट झ्ा़ाली असून देशाच्या कमकुवत आर्थिक स्थितीमुळे ती सुधारण्यासाठी पैसा उपलब्ध नाही. सरकार रेल्वे सुधारणेला प्राधान्य देत नाही. त्यामुळे वारंवार असे अपघात होत आहेत, अशी टीका तेथील तज्ञ करीत आहेत. गेल्या 8 वर्षांमध्ये असे किमान सहा अपघात झाले असल्याचे सांगण्यात आले.