बँका, न्यायाधीश, वकिलांच्या नावांचा वापर : वसुलीसाठी तगादा लावणाऱयांना दणका : इन्शुरन्सच्या पॉलिसीधारकांनाही 26 लाखांना ठकविले
प्रतिनिधी / बेळगाव
कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी बुधवारी पत्रकारांना ही माहिती दिली. सीईएन विभागाचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर व त्यांच्या सहकाऱयांनी बुधवारी सकाळी मधुकर विलास सापळे (वय 31) रा. शास्त्राrनगर याला अटक केली आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करून त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले.
मधुकर सापळे या ठकसेनाचे कारनामे थक्क करणारे आहेत. त्याच्याविरुद्ध 2 नोव्हेंबर 2020 रोजी येथील सीईएन विभागात एफआयआर दाखल झाला होता. तेव्हापासून या प्रकरणाची तांत्रिकरीत्या चौकशी सुरू होती. पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर यांनी चौकशी सुरू केल्याचे समजताच गेल्या 6 फेब्रुवारीपासून मधुकर बेपत्ता होता. बुधवारी पोलिसांनी त्याच्या मुसक्मया आवळल्या आहेत.
युनियन बँकेला 3, आयडीबीआय बँकेला 1, एसबीआयला 1 याप्रमाणे त्याने नोटिसा पाठविल्या होत्या. केवळ बेळगाव शहरच नव्हे तर खानापूर येथील बँक ऑफ महाराष्ट्राच्या एका ग्राहकाचे खाते गोठविण्यासाठी 1 व संकेश्वर येथील एका बँकेलाही त्याने ईडीच्या नावे नोटिसा पाठविल्या होत्या. लॉकडाऊनच्या काळात हुबेहूब ईडीच्या वाटाव्यात अशा पद्धतीने नोटिसा पाठवून त्याने काही ग्राहकांची खाती गोठविण्यास भाग पाडले होते.
या नोटिसा ईडीकडूनच आल्या असतील या समजुतीने वेगवेगळय़ा बँक व्यवस्थापकांनी ज्या-ज्या ग्राहकांची नावे नोटिसीत होती, त्यांची खाती गोठवून ईडीला पत्र पाठविले होते. ‘तुम्ही पाठविलेल्या नोटिसीनुसार संबंधित ग्राहकांची खाती गोठविण्यात आली आहेत’, असे बँकांनी पाठविलेले पत्र पाहून नवी दिल्ली येथील ईडीचे अधिकारीही थक्क झाले होते. त्यांनी बेंगळूर येथील सीआयडी मुख्यालयाला पत्र पाठवून ‘बेळगाव जिल्हय़ातील बँकांना ग्राहकांची खाती गोठविण्यासाठी आम्ही नोटिसा पाठविल्या नाहीत. फसवणुकीचा हा प्रकार आहे. याची चौकशी व्हावी’, अशी मागणी केली होती. ईडीच्या अधिकाऱयांनी केलेल्या सूचनेनुसार सुरुवातीला सीआयडी विभागातील अधिकाऱयांनी या प्रकरणाची चौकशी केली होती. मधुकर सापळेची करामत चौकशीत स्पष्ट होताच 2 नोव्हेंबर 2020 रोजी त्याच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला होता.
पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन, उपायुक्त डॉ. विक्रम आमटे आदी वरि÷ अधिकाऱयांच्या मार्गदर्शनाखाली या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावण्यात अधिकाऱयांना यश आले आहे. मधुकर सापळेने आपल्या परिचयातील सात जणांकडून गरजेसाठी पैसे घेतले होते. त्यांनी पैसे परत मागताच त्यांच्यावर सूड उगवण्यासाठी ईडीच्या नावे बँकांना नोटिसा पाठवून त्यांची खाती गोठवण्यास भाग पाडले होते, असे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.
प्रतिष्ठित वकिलांच्या नावांचा उल्लेख
बनावट कागदपत्रे तयार करून पीएनबी मेटलाईफ इन्शुरन्स कंपनीच्या बारा पॉलिसीधारकांनाही या महाभागाने 26 लाखांना ठकविल्याचे उघडकीस आले आहे. केवळ ईडीच नव्हे तर न्यायाधीश व काही प्रति÷ित वकिलांच्या नावांचा उल्लेख करून मधुकरने काही जणांना कायदेशीर नोटिसा पाठविल्याचेही उघडकीस आले आहे. यासंबंधी त्याने कबुली दिली असून केवळ बेळगावच नव्हे तर वेगवेगळय़ा राज्यातही त्याने ईडीच्या नावे नोटिसा पाठविल्याचे उघडकीस आले आहे.
पोलीस कोठडीत घेऊन चौकशी त्याच्याजवळून बनावट रबरी शिक्के तयार करण्यासाठी आवश्यक असलेली मशीन, बनावट कागदपत्रे तयार करून त्यांची प्रिंट काढण्यासाठी वापरलेले प्रिंटर, एक इनोव्हा व एक स्विफ्ट डिझायर कार पोलिसांनी जप्त केली आहे. ईडीच्या नावाचा वापर करून त्याने बँकांना नोटिसा पाठविल्यामुळे पोलीस दलाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली आहे. पोलीस कोठडीत घेऊन त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे.