जिल्हाधिकाऱयांना निवेदन
बेळगाव : ईद-ए-मिलाद मंगळवार दि. 19 रोजी आहे. त्या निमित्त शहरातून रॅली काढण्यात येते. मुस्लिम बांधवांचा हा एक महत्वाचा जण आहे. आता कोरोना कमी झाला आहे. त्यामुळे आम्हाला हा सण साजरा करण्यास मुभा द्यावी, अशी मागणी सीरत कमिटी बेळगाव यांच्यावतीने करण्यात आली.
मुस्लिम बांधवांच्यावतीने हा सण अत्यंत शांततेत आणि उत्साहात साजरा केला जातो. मात्र कोरोनामुळे मागील वषी या सणांवर निर्बंध घालण्यात आले होते. मात्र आता कोरोना कमी झाला आहे. त्यामुळे इतरांच्या सणांप्रमाणे आम्हालाही हा सण साजरा करण्यास परवानगी द्या, असे या निवेदनात म्हटले आहे. त्या दिवशी शहरातील फोर्ट रोड, बस स्टॅन्ड, आरटीओ सर्कल, न्यायालय, चन्नम्मा सर्कल, लिंगराज कॉलेज, कॅम्प दर्गा या परिसरातुन रॅली काढली जाते. तेंव्हा त्या रॅलीलाही परवानगी द्यावे, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी संघटनेचे पाधिकारी उपस्थित होते.