ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :
निवृत्ती वेतन अर्थात पेन्शन मिळवण्यासाठी हयात असल्याचा दाखला द्यावा लागतो. याला जीवन प्रमाणपत्र म्हणतात. ईपीएफओने देशभरात पेन्शन घेणाऱ्या 65 लाख लोकांना दिलासा दिला आहे.
एम्प्लाॅयिज पेन्शन स्कीम अंतर्गत निवृत्त कर्मचाऱ्यांना आता पेन्शनचा काही हिस्सा आता आधी घेता येणार आहे.
या सुविधेमुळे दर महिन्याला मिळणाऱ्या पेन्शन मधील एक तृतीयांश हिस्सा एकरकमी पद्धतीने आधीच घेता येणार आहे. त्यानंतर पंधरा वर्षांपर्यंत त्यांच्या पेन्शन मधून एक तृतीयांश रक्कम कापली जाणार आहे. या निर्णयामुळे ज्या निवृत्त कर्मचाऱ्यांना एकरकमी पैशाची गरज असेल त्यांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.
दरम्यान, ईपीएफओची देशभरात 125 प्रादेशिक केंद्रे आहेत. असे 117 जिल्हे आहेत जिथे जिल्हास्तरीय ईपीएफओ कार्यालय आहेत.