विश्वचषक जेता कर्णधार मॉर्गन, अँडरसन, आर्चरची वर्णी, ऍलेक्स हॅलेस, प्लंकेट, जो क्लार्क मात्र अनभिज्ञ
लंडन / वृत्तसंस्था
विश्वचषक विजेता कर्णधार इयॉन मॉर्गन, जलद गोलंदाज जोडगोळी जेम्स अँडरसन व जोफ्रा आर्चर यांच्यासह एकूण 55 खेळाडूंनी थेट मैदानात सरावाला सुरुवात करावी, अशी सूचना इंग्लंड व वेल्स क्रिकेट मंडळाने (ईसीबी) शुक्रवारी केली. खेळाडूंच्या सरावादरम्यान स्टेडियम बंदिस्त असेल, जेणेकरुन कोणालाही आत प्रवेश करता येणार नाही.
इंग्लंडच्या 18 गोलंदाजांनी मागील आठवडय़ातच सरावाला सुरुवात केली, त्यांचाही या 55 खेळाडूंच्या यादीत समावेश आहे. आश्चर्याची बाब म्हणजे ऍलेक्स हॅलेस, लियाम प्लंकेट व जो क्लार्क या बडय़ा खेळाडूंची मात्र या यादीत वर्णी लागलेली नाही.
नजीकच्या कालावधीत सुरक्षिततेला पाचारण देत कौंटी क्लब संघांच्या सहकार्याने खेळाडूंचा सराव पूर्वपदावर आणणे, हा ईसीबीचा प्राधान्यक्रम असल्याचे यावेळी सांगण्यात आले. मोईन अली, जॉनी बेअरस्टो, स्टुअर्ट ब्रॉड, जोस बटलर, अदिल रशिद, टॉम करण, डेव्हिड विली व सॅम बिलिंग्ज या खेळाडूंनाही ईसीबीने सराव सुरु करण्याची सूचना केली.
निश्चित क्रिकेट प्रकारासाठी लवकरच संघनिवड केली जाईल, असे ईसीबीने यावेळी जाहीर केले. ‘तिन्ही क्रिकेट प्रकारांसाठी संघनिवड करत असताना मुबलक पर्याय हाताशी असणे केव्हाही महत्त्वाचे ठरते. या हंगामात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याच्या उंबरठय़ावर आपण पोहोचलो आहोत. वैद्यकीय पथक व प्रशासनाचे दिशानिर्देश आमच्यासाठी विशेष महत्त्वाचे असतील’, असे मंडळाचे परफॉर्मन्स संचालक मो बोबत यांनी पत्रकातून नमूद केले.
खेळाडूंची यादी : मोईन अली (वर्सेस्टरशायर), जेम्स अँडरसन (लँकेशायर), जोफ्रा आर्चर (ससेक्स), जॉनी बेयरस्टो (यॉर्कशायर), टॉम बॅन्टन (सॉमरसेट), डॉम बेस (सॉमरसेट), सॅम बिलिंग्ज (केन्ट), जेम्स ब्रेसे (ग्लॉसेस्टरशायर), स्टुअर्ट ब्रॉड (नॉटिंगहमशायर), हेन्री ब्रूक्स (वर्विकशायर), पॅट ब्राऊन (वर्सेस्टरशायर), रोरी बर्न्स (सरे), जोस बटलर (लँकेशायर), ब्रेडॉन कार्से (डरहम), मेसॉन क्रेन (हॅम्पशायर), झॅक क्रॉली (केन्ट), सॅम करण (सरे), टॉम करण (सरे), लियाम डॉसन (हॅम्पशायर), जो डेन्ली (केन्ट), बेन डकेट (नॉटिंगहमशायर), लॉरी इव्हान्स (ससेक्स), बेन फोक्स (सरे), रिचर्ड ग्लेसन (लँकेशायर), लुईस ग्रेगरी (सॉमरसेट), सॅम हेन (वर्विकशायर).
टॉम हेम (मिडलसेक्स), विल जॅक्स (सरे), केटॉन जेनिंग्ज (लँकेशायर), ख्रिस जॉर्डन (ससेक्स), टॉम कॅडमोर (यॉर्कशायर), डॅन लॉरेन्स (इसेक्स), जॅक लीच (सॉमरसेट), लियाम लिव्हिंगस्टोन (लँकेशायर), सकिब महमूद (लँकेशायर), डेव्हिड मलान (यॉर्कशायर), इयॉन मॉर्गन (मिडलसेक्स), क्रेग ओव्हर्टन (सॉमरसेट), जेमी ओव्हर्टन (सॉमरसेट), मॅट पार्किन्सन (लँकेशायर), ऑलि पोप (सरे), अदिल रशीद (यॉर्कशायर), ऑलि रॉबिन्सन (ससेक्स), जो रुट (डरहम), जेसॉन रॉय (सरे), फिल सॉल्ट (ससेक्स), डॉम सिबली (वर्विकशायर), बेन स्टोक्स (डरहम), ऑलि स्टोन (वर्विकशायर), रीस टॉपली (सरे), जेम्स व्हिन्स (हॅम्पशायर), अमर व्हिर्दी (सरे), डेव्हिड विली (यॉर्कशायर), ख्रिस वोक्स (वर्विकशायर), मार्क वूड (डरहम).