प्रतिनिधी / कुडचडे
कुडचडे येथील ईस्ट केपे कंझ्युमर्स को-ऑप. सोसायटी लि. या संस्थेच्या कुडचडेतील सर्वोदय हायस्कूलच्या सभागृहात नुकत्याच झालेल्या निवडणुकीत दोन गट आपल्या उमेदवारांसह रिंगणात उतरले होते. त्यातील एका गटातील आठ उमेदवारांना, तर दुसऱया गटातील दोन उमेदवारांना जास्त मते प्राप्त झाल्यामुळे त्यांचा विजय झाला.
एक जागा अनुसूचित जमातींसाठी आरक्षित होती. त्या जागेवर दत्ता गावकर यांची बिनविरोध निवड झाली होती. राहिलेल्या जागांसाठीच्या निवडणुकीत एका गटातून नऊ उमेदवार, तर दुसऱया गटातून एकूण सहा उमेदवार उतरले होते. एकूण 15 उमेदवारांपैकी सोसायटीच्या सदस्यांना आठ जण निवडायचे होते. त्यासाठी झालेल्या मतदानावेळी एकूण 3582 सदस्यांपैकी फक्त 1089 सदस्यांनी मतदान केले. पुरुष उमेदवारांमध्ये देऊ सोनू नाईक यांना 624, तर महिला उमेदवारांत अनिता अमृत नाईक यांना 583 अशी सर्वांत जास्त मते प्राप्त झाली. तसेच जितेंद्र नाईक खांडेकर-535, हनुमंत वस्त-527, नारायण शेटय़े-499, सुलभा सावंत-472, आग्नेल फर्नांडिस-448, सुदेश नाईक-429 यांनाही जास्त मते प्राप्त होऊन ते विजयी झाले.