वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशातील टॉप टियर म्हणून ओळखल्या जाणाऱया इंडियन सुपरलिग फुटबॉल स्पर्धेत अध्यक्ष रेनेडी सिंग यांच्याशी कोणताही संपर्क न साधताना कोलकात्याच्या ईस्ट बंगाल संघाचा समावेश करण्यात आल्याने अखिल भारतीय फुटबॉलपटू संघटनेतर्फे नाराजी व्यक्त करण्यात आली असून या संदर्भात या संघटनेतर्फे अखिल भारतीय फुटबॉल संघटनेकडे लेखी तक्रारीचे पत्र पाठविण्यात आले आहे.
अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनचे सरचिटणीस कुशल दास हे आयएसएल स्पर्धा आयोजन क्रीडा विकास समितीचे ज्ये÷ अधिकारी आहेत. त्याचप्रमाणे भारतीय फुटबॉलपटू संघटनेचे सरव्यवस्थापक सायरस कन्फेक्शनर यांनी या प्रकरणी अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनला पत्र पाठविले असून या निर्णयामुळे मतभेद तीव्र होतील, असे सूचित करण्यात आले आहे.
यासंदर्भात अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष सामोपचाराने पडदा टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत. कोलकात्याच्या ईस्ट बंगाल फुटबॉल क्लबला बऱयाच वर्षांचा इतिहास लाभला आहे. भारतीय फुटबॉल क्षेत्रातील ईस्ट बंगाल हा एक जुना फुटबॉल क्लब म्हणून ओळखला जातो. या प्रकरणी फेडरेशनचे अध्यक्ष रेनेडी सिंग यांना कोणतीच कल्पना दिली नसल्याचे स्पष्टीकरण अखिल भारतीय फुटबॉलपटूंच्या संघटनेने केले आहे. कोलकात्यातील ईस्ट बंगालचा प्रतिस्पर्धी म्हणून ओळखला जाणारा मोहन बगानचा संघ इंडियन सुपरलिगमध्ये पदार्पण करण्याच्या मार्गावर आहे. मोहन बगान आणि एटीके हे दोन संघ आता एकत्रित झाले आहेत. ईस्ट बंगाल फुटबॉल संघाला आर्थिक समस्येला सध्या तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे या क्लबमधील अनेक फुटबॉलपटू आपल्या थकित मानधनासाठी अखिल भारतीय फुटबॉल संघटनेकडे दाद मागत आहेत.