साहित्य-सेवांसंदर्भात तक्रारी करण्याची संधी : संबंधीत कंपन्यांनी नियम न पाळल्यास होणार दंड
वृत्तसंस्था / मुंबई
सध्या ई-कॉमर्स क्षेत्राच्या वाढत जाणाऱया विस्ताराच्या प्रभावामुळे दिवसागणिक ई-कॉमर्स संदर्भातील नियमावली बदलत जात असल्याचे पहावयास मिळत आहे. यामध्ये आता ई कॉमर्स कंपन्यांच्या ग्राहकांना आपली तक्रार करणे सोपे होणार आहे. याच्यासाठी सरकारने तक्रारी दाखल करण्यासाठी नोडल अधिकाऱयांची नियुक्ती करावी यासाठी एक परिपत्रक 17 मेपासून लागू करण्यात आले आहे.
सदरच्या नोडल अधिकाऱयाचा अर्थ असा आहे, की सर्व ई-कॉमर्स कंपन्यांच्या ग्राहकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी एका अधिकाऱयाची नियुक्ती होणार आहे. याची संपूर्ण माहिती ब्युरो वेबसाईटवर द्यावी लागणार आहे. जर का यामध्ये कोणत्याही प्रकारची तक्रार करावयाची असल्यास वेबसाईटवर 48 तासांच्या आता त्याबाबत सांगावे लागणार आहे. तसेच एका महिन्याच्या आत तक्रारीचे निवारण करावे लागणार आहे.
विदेशी कंपन्यांना नियम लागू
सरकारने दिलेल्या माहितीनुसार सदरचा नियम हा ज्या कंपन्या विदेशामध्येही नेंदणीकृत झाल्या आहेत, त्यांनाही लागू होणार आहे. हा नवीन नियम कंझ्युमर प्रोटेक्शन रुल्स 2020 च्या अंतर्गत करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
नोडल अधिकारी भारतात असणे आवश्यक
नवीन कंझ्युमर प्रोटेक्शन कायदा 2019 नुसार नोडल अधिकारी भारतामध्ये कार्यरत राहणे आवश्यक आहे.
तक्रार कशासाठी करता येईल
कोणत्याही साहित्य किंवा वस्तूबाबत तक्रार, ई कॉमर्स कंपन्यांकडून मिळणाऱया सेवांबाबतही तक्रार दाखल करता येणार आहे. सरकारने या कंपन्यांना सांगितले आहे, की त्यांनी एक नोडल अधिकाऱयाची नियुक्ती करावी. तसेच या अधिकाऱयांनी नवीन नियमांच्या आधिन राहून ग्राहकांना संरक्षण देण्यास बांधील राहावे लागणार असल्याची माहिती आहे.