मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी/ पणजी
राज्यात ई बाईक शोरूम तसेच ई बाईक सुरू करून पर्यावरण वाचविण्यात मोलाचे कार्य केले आहे. अशा बाईकच्या वापरामुळे कार्बन उत्सर्जनावर नियंत्रण ठेवण्यास मदत केले आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दोनापावला येथे बेल्लिंग ऑरा इलेक्ट्रिक बाईक्सच्या उद्घाटन सोहळय़ाप्रसंगी बोलताना केले.
यावेळी गोवा मनोरंजन सोसायटीचे उपाध्यक्ष सुभाष फळदेसाई, नेत्रावळी पंचायतीचे माजी सरपंच रजनी गावकर, चेतन देसाई उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्याहस्ते ग्राहकांना चावी देण्यात आली.
आत्मनिर्भर भारत अंतर्गत स्वयंपूर्ण गोवा बनविण्यासाठी गोमंतकीयांना प्रोत्साहित केले जात आहे. गोमंतकीयांना विविध उद्योग व्यवसायात येणे आवश्यक आहे. आतापर्यंत 80 खाते आत्मनिर्भर योजनेत समाविष्ट करण्यात आल्या असून 27 योजना सुरू करण्यात आले आहे. युवकांना रोजगार मिळावा यासाठी राज्य सरकार पुढाकार घेत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
सदर बाईकमुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे. अशाप्रकारच्या बाईक तयार करून उत्तम कार्य केले आहे असे मत सुभाष फळदेसाई यांनी व्यक्त केले.
एमएचए मार्गदर्शक तत्त्वांनुसार जे काही येत आहे ते सुरू करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून ज्याला मान्यता आहे ते सुय् करता येते. थिएटर्स सुरू करण्यात परवानगी देण्यात आली असली तरीही सुरू करणे ही थिएटर मालकांच्या हातात आहे. जोपर्यंत थिएटर्स किंवा इतर व्यवसाय सुरू करत नाहीत तोपर्यंत व्यवसाय कसा होणार हे कळणे कठीण आहे असे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले.