प्रतिनिधी / बार्शी :
तालुक्मयातील उक्कडगाव येथील वयोवृद्ध दाम्पत्याने राहत्या घरात अज्ञात कारणावरुन गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार सोमवारी सायंकाळी उघडकीस आला.
प्रभाकर पंढरी मुळे (वय 65) व मुक्ताबाई प्रभाकर मुळे (वय 60, दोघेही रा. उक्कडगाव) अशी गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या पती-पत्नीचे नाव आहे. आत्महत्येचे मूळ कारण अजून समजले नाही. पुतणे दीपक बजरंग मुळे यांनी याबाबत पांगरी पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. दीपक हे उक्कडगाव येथील एसटी स्टँडमध्ये बसले असताना अच्युत मुळे यांनी याबाबत माहिती दिल्याने ते घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा पती-पत्नीने साडीने बनवलेल्या दाव्याने गळफास घेतलेल्या स्थितीत दिसले.