प्रतिनिधी/ बेळगाव
उक्कड (ता. बेळगाव) येथील एका जुगारी अड्डय़ावर छापा टाकून तिघा जणांना अटक करण्यात आली. शनिवारी सायंकाळी काकती पोलिसांनी ही कारवाई केली असून तिघेजण फरारी झाले आहेत. सर्व सहा जणांविरुद्ध काकती पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
उक्कड येथे अंदरबाहर जुगार सुरू असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राघवेंद्र हळ्ळूर व त्यांच्या सहकाऱयांनी अचानक छापा टाकला. प्रवीण शंकर नाईक (वय 24), आनंद शिवराय नाईक (वय 38), मारुती लगमाण्णा काटाबळी (वय 37) हे तिघेजण पोलिसांच्या तावडीत सापडले.
सिद्राय नाईक, मारुती गुरव, लक्ष्मण सनदी हे तिघेजण फरारी असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. अटक करण्यात आलेल्या तिघा जणांकडून 1420 रुपये रोख रक्कम, तीन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. सर्व सहा जणांविरुद्ध कर्नाटक पोलीस कायदा 87 व संसर्गजन्य रोगप्रतिबंधक कायद्यानुसार एफआयआर दाखल करण्यात आला आहे.