वाढत्या डेंग्यू रूग्णामुळे वैद्यकीय अधिकाऱयांना आदेश : कुर्टी पंचायत येथील संयुक्त बैठकीत विविध समस्यावर चर्चा
प्रतिनिधी /फोंडा
पावसाळय़ात वाढणारी रोगराई आटोक्यात आणण्यासाठी फोडा तालुक्यात पुर्ण दक्षता घेण्यात येईल. कुर्टी पंचायतीला डेंग्यू पासून बचाव करण्यासाठी फॉमिंग मशिनची सोय करण्यात येणार आहे. संशयित डेंग्य़ूच्या रूग्णामध्ये झपाटय़ाने होत असलेल्या वाढीच्या अनुषंगाने खुल्या गटारात सांडपाणी व मलनिस्सारण कचरा सोडणाऱया घरांचे पाणी व वीज जोडणी कापून आरोग्य खात्याने कारवाई करावी असा आदेश कृषी मंत्री रवी नाईक यांनी दिला.
कुर्टी खांडेपार पंचायत सभागृहात काल शुक्रवारी उपजिल्हाधिकारी व सरकारच्या विविध खात्याच्या अधिकाऱयाची संयुक्त बैठक घेण्यात आली. यावेळी कुर्टी पंचायत क्षेत्रासह फोंडा तालुक्यात भेडसावणाऱया मुख्य समस्याचे निवारण जलदगतीने कसे होईल यावर चर्चा करण्यात आली. ओपा व कोपरवाडा कुर्टी येथील सरकारी विद्यालयाची दुरूस्ती, पावसळयात आपत्ती परिस्थितीत नागरिकांना तातडीने मदत पुरविण्यासाठी उपजिल्हाधिकाऱयातर्फे ग्रामस्थाच्या सहकार्याने प्रत्येक पंचायतीत आपत्कालीन तुकडया बनविण्यात येईल अशी माहिती मंत्री रवी नाईक यांनी दिली.
कुर्टी-खांडेपार पंचायतीला हवेय कायमस्वरूपी ‘पंचायत घर’
कुर्टी व खांडेपार अशा दोन ठिकाणाहून कार्यालयीन कारभार हाकणाऱया पंचायतीचा अजून कायमस्वरूपी पंचायत इमारतीचा प्रश्न ताटकळत आहे. त्यावर तोडगा काढताना कुर्टी येथील हाऊसिंग बोर्ड कॉलनीतील आरक्षित करण्यात आलेल्या 1352 चौ मिटर जमिनीत पंचायत घर व मार्केट उभारण्याचे अंतिम मंजूरी गृहनिर्माण खात्याने अडविलेली निदर्शनास आणण्यात आली. गट विकास अधिकाऱयाच्या मार्गदर्शनाखाली जलदगतीने हे काम तडीस नेण्याचे आदेश मंत्री रवी नाईक यांनी दिले. कुर्टी खांडेपार पंचायतीचा कारभार कुर्टी व खांडेपार अशा दोन कचेरीत होत असल्यामुळे ग्रामस्थांची तारंबाळ उडत असते. एकाच ठिकाणी तलाटी, सचिव व इतर कार्यालयीन कामे झाल्यास सर्वाचे सोयीचे ठरणार असल्यामुळे पंचसदस्यसही आग्रही आहेत.
सपना पार्क येथील रस्ताची पाहणी, धोकादायक झाडे हटविणार
उपजिल्हाधिकाऱयानी दिलेल्या आदेशानुसार रस्त्याच्या कडेला वाहतूक व पादचाऱयासाठी धोकादायक ठरलेल्या झाडे तोडून घेण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. ओपा खांडेपार येथील जन्क्शनवरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी खांडेपार नदीवरील नवीन पूलाची जोडणी रस्ता पुर्ण होण्याकडे मंत्री रवी नाईक यांनी सोपस्कर पुर्ण करण्याकडे भर दिला जाईल असे सांगितले. कुर्टी पंचायत क्षेत्रातील खड्डेमय झालेल्या अंतर्गत रस्त्याची डागडुजी करताना ओपा खांडेपार जन्क्शन ते मुर्डी खांडेपारपर्यंत व ओपा जन्क्शन ते ओपा वाडय़ावरपर्यंत रस्त्याचे पावसाळय़ानंतर हॉटमिक्स डांबरीकरण करण्यात येईल. सपना पार्क बेतोडा रोड येथे पावसाळय़ात कायम उखडणाऱया रस्त्याची कायमस्वरूपी तोडगा काढणे गरजेचे असल्याचे मत मंत्री नाईक म्हणाले. त्यासंबंधी बांधकाम खात्याच्या रस्ते विभाग 18 च्या अभियंत्यांना तात्काळ पाणी साचत असलेल्य़ा रस्त्याची पाहणी करून पुढील कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे.
डेंग्यूच्या वाढत्या प्रमाणावर नियंत्रण वैद्यकीय अधिकाऱयांनी ठेवावे
फोंडा तालुक्यात डेंग्य़ू संशयित रूग्णामध्ये झपाटय़ाने होत असलेल्या वाढीच्या अनुषंगाने मंत्री रवी नाईक यानी वैद्यकीय अधिकाऱयाच्या टिमकडे आढावा घेतला. डेंग्यूच्या वाढत्या रूग्णांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी गांभीर्याने लक्ष घालून त्वरीत उपाययोजना पालीका व पंचायतीच्या सहाय्याने करण्यात याव्यात अशा सुचना वैद्यकीय अधिकाऱयांना दिल्या. फेंडा तालूक्यात मार्च 2022 ते आजपर्यंत एकूण 69 डेंग्यू संशयित रूग्ण आढळलेले आहेत. यामध्ये दत्तगड बेतोडा येथे सर्वाधिक 30 संशयित आहेत. त्यामुळे बिगरगोमंतकीयांच्या वस्ती थाटलेल्या कुर्टी-फोंडा, दीपनगर, बाबल्याखळी, तळे दुर्गाभाट, दत्तगड, आशेवाडा या भागात आरोग्य खात्याच्या टिमने भेट देऊन पाहणी करावी अशा सुचना करण्यात आल्या.
फोंडा तालुक्यातील मागील आठ वर्षापासून रेंगाळत असलेल्या मलनिस्सारण प्रकल्पाचे काम अजूनपर्यंत पुर्ण झाले नसल्याचे कालच्या बैठकीत निदर्शनास आले. तरीही कुर्टी येथील भागाची जोडणी तुर्तास न करता फोंडा तालुक्यातील पाईपची जोडणी पुर्ण झालेल्या चेंबरच्या सहाय्याने सद्या प्रायोगिक तत्वावर कवळे येथील प्रकल्प सुरू करण्यात येणार असल्याचे संकेत यावेळी देण्यात आले. वाहतूक व पोलीस स्थनाकातील पोलिसांनी पावसाळय़ात शहर परिसरात होणाऱया चोरीमारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सतर्क राहण्याचे आदेश मंत्री रवी नाईक यांनी पोलीस निरीक्षकांना दिले.