अमेरिकेतील टिकटॉक सेंसेशन एरिका थॉमसन
आपल्यापैकी बहुतांश लोक मधमाशांचे नाव ऐकताच घाबरतात. अशा स्थितीत अमेरिकेच्या टेक्सासमधील एरिका थॉमसन मधमाशा पाळणारी व्यावसायिक आहे. ती 9 वर्षांपासून हे काम करत आहे. कुठलेही किट न घालता मोकळय़ा हातांनीच भिंतीवरील मधमाशांना हटविणे हे तिचे वैशिष्टय़ आहे. स्वतःच्या याच छंदामुळे ती व्हायरल टिक टॉक सेंसेशन ठरली आहे.
लॉकडाउनमध्ये बहुतांश लोक घरबसल्या मोबाईलमध्ये गुंतवून घेत असताना एरिका मधमाशांचे पोळे काढण्याचे काम करत होती. तिने या सर्व ठिकाणांवरील मधमाशांचे पोळे हटवितानाच्या चित्रफिती प्रसारित केल्या असून त्यांना सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद मिळाला आहे. 35 वर्षीय एरिकाला लहानपणापासूनच प्राणी पाळण्याची आवड होती.
2011 साली एरिकाने बीकीपिंगचा क्लास सुरू केला आणि तेथे कम्युनिकेशन डायरेक्टर म्हणून काम करू लागली. त्यानंतर एरिकाने जमीन खरेदी करत मधमाशांचे पालन सुरू करत यातच स्वतःची कारकीर्द घडविण्याचा निर्णय घेतला.