उचगांव /प्रतिनिधी
उचगांव(ता.करवीर ) शांतीनगर पूर्व येथील ५२ वर्षीय कोरोना बाधित शासकीय कर्मचाऱ्याचा आज मृत्यू झाला. आज त्या कर्मचाऱ्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. कोरोनाबाधित रुग्णांचा उचगांव मधील हा दुसरा मृत्यू आहे.याआधी कोरोनाबाधित ७० वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाला होता. उचगांव मध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या तीस झाली आहे.
शासकीय कर्मचारी म्हणून तो सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात नोकरीस होता.सध्या तो उचगांव येथे न रहाता बाहेर राहत होता.त्या रुग्णास मधुमेह व रक्तदाबाचा त्रास होता.त्यास त्रास झाल्यानंतर सीपीआर रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.गुरुवारी त्या शासकीय कर्मचाऱ्याचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला.खबरदारीचा उपाय म्हणून उचगांव ग्रामपंचायतीने शांतीनगर येथील रुग्णाच्या घराजवळचा परिसर सील केला असुन औषध फवारणी करुन निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.