एक महिला गंभीर जखमी : कारचालकाचे पलायन
उचगांव / प्रतिनिधी –
वेगात असलेल्या स्कोडा कारने वेरना कार, दोन दुचाकी व रिक्षाला दिलेल्या धडकेत एक महिला गंभीर जखमी झाली, तर अन्य काही जण किरकोळ जखमी झाले. अपघात होताच कारचालकाने पलायन केले. शुक्रवारी रात्री उचगाव फाट्यानजीक हा अपघात झाला.
घटना स्थळावरून मिळालेली माहिती अशी की, कोल्हापूरहून स्कोडा कार ( एम एच 10 एएन 8696) हुपरीच्या दिशेने जात होती. वेगात असलेल्या या कारने दोन दुचाकी, एक रिक्षा व वेरना कारला ( एम एच 09- सीएम 9007) धडक दिली. त्यात एक महिला गंभीर जखमी झाली.
अपघात होताच कार चालकाने पलायन केले. घटनास्थळी गांधीनगर पोलीस आले. त्यांनी घटनास्थळी असलेली स्कोडा कार ताब्यात घेतली. मात्र याबाबत गांधीनगर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद झाला नाही.