उचगाव : व्यायाम हा जीवनातील एक महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे. युवकांमध्ये सातत्याने व्यायामाची आवड निर्माण होण्यासाठी खुल्या जीमची निर्मिती करणारी मंडळी अभिनंदनास पात्र असल्याचे मत मुख्याध्यापक एन. ओ. चौगुले यांनी व्यक्त केले. उचगाव गणेश मार्कंडेय तीर्थक्षेत्रावरील गणेश मंदिराच्या आवारात सुशील देसाई यांच्या सौजन्याने खुल्या जीमचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी एन. ओ. चौगुले बोलत होते. प्रारंभी गणेश मंदिरामध्ये गणेश मूर्तीचे पूजन अमर जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. सदर खुल्या जीमचे उद्घाटन अभियंते सुशील देसाई यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी पवन देसाई, गणपत देसाई, नेहाल जाधव, अनिल पाटील, तुषार देसाई, परशराम जाधव, श्रीकांत चौगुले, प्रमोद देसाई, उदय कदम, श्रेयस देसाई, पवन पाटील, जितेश नाईक, राहुल पावशे, पुंडलिक पावशे, कांत पावले, यतेश हेब्बाळकर, अक्षय अष्टेकर उपस्थित होते. या खुल्या जीमचा उपयोग उचगाव, कल्लेहोळ, तुरमुरी, बाची, सुळगा येथील युवकांना होणार आहे. सदर खुल्या जीमसाठी नेहाल जाधव यांनी प्रयत्न केल्याने त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
Previous Articleकोरोनाबाबत जनजागृतीसाठी शहरातून रॅली
Next Article परमहंस गुप्तानंद महाराज यांची 69 वी पुण्यतिथी
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.