उचगाव /वार्ताहर
उचगाव (ता.करवीर) येथील मुख्य रस्त्यावर गावभागात एक पंचेचाळीस वर्षीय महिलेचा कोरोना अहवाल बुधवारी पॉझिटिव्ह आला. तर दोन दिवसापूर्वी कोरोना पॉझिटिव्ह युवकाच्या संपर्कातून त्याची पत्नी, बहीण व भाचा बुधवारी पॉझिटिव्ह आले. उचगाव मुख्य रस्ता सील करण्यात आला आहे. सलग तिसऱ्या दिवशी उचगांवात कोरोनाचे चार रुग्ण आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे.त्यामुळे उचगावात कोरोना पॉझिटिव्ह संख्या आठ झाली आहे. उचगांव रविवार पर्यंत संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आले आहे.
पंचेचाळीस वर्षीय महिला राजारामपुरी येथील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये काम करीत होते. त्या दवाखान्यात एक जण पॉझिटिव्ह आल्यानंतर या महिलेचा स्वँब घेण्यात आला होता.बुधवारी सकाळी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर उचगांवात खळबळ उडाली. या रुग्णाच्या संपर्कातील नातेवाईक व इतर व्यक्तींना पुढील तपासणीसाठी सीपीआर येथे तपासणीसाठी नेण्यात आले . तर दोन दिवसापूर्वी आलेल्या युवकाच्या संपर्कातील पत्नी , बहिण व भाचा कोरोना पॉझिटिव्ह आल्याने उचगावात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आठ झाली आहे.
उचगाव मुख्य रस्ता बॅरिकेट लावून ग्रामपंचायतीने बंद केला आहे. तसेच सर्व परिसर निर्जंतुकीकरण करण्यात आला आहे. सरपंच मालुताई काळे, गणेश काळे, उपसरपंच मनीषा गाताडे, तलाठी महेश सूर्यवंशी, ग्रामविकास अधिकारी अजित राणे, पोलिस पाटील स्वप्निल साठे, ग्रामपंचायत सदस्यस गिता अनिल दळवी, विनायक जाधव, मधुकर चव्हाण, रमेश वाईंगडे ,रवी काळे व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी परिसर सील केला.